ब्रेकिंग न्यूज
उल्हासनगर : रेल्वे स्टेशनबाहेर वडापावच्या दुकान मालकाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, चंदरलाल रामरखियानी 100 % भाजले      पाकिस्तानात बेपत्ता झालेले दोन्ही मौलवी भारतात परतले      बेळगावात ड्राय डेच्या दिवशी दारु न दिल्याने पोलिसांची हॉटेल मॅनेजरला लाथा-बुक्क्यांनी मारहाण      नागपूरमध्ये राजू शेट्टी यांचे स्टेट बँक इंडियाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन      पतीची हत्या करुन मृतदेह बीएमडब्ल्यू गाडीत लपवला, पत्नीविरोधात गुन्हा दाखल, पंजाबमधील घटना      उत्तरप्रदेशमध्ये बहुजन समाज पक्षाचे नेते मोहम्मद समी यांची भररस्त्यात हत्या      छत्तीसगडमधील दंतेवाडामधूल पाच नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा हस्तगत      महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना फसवणारा, जनतेला गाजर दाखवणारा अर्थसंकल्पः जयंत पाटील      जळगाव : शहरापासून जवळच असलेल्या भादली गावात मध्यरात्री एका कुटुंबातील चौघांची चोरटयांनी हत्या केली.      मुंबईने गमावला मतदानाचा अधिकार, ईशान्य भारतातील राज्यांना मिळाला BCCI मध्ये मतदानाचा हक्क
...

अहिराणी भाषेवर संशोधन करणा-या तरुणांना सरकार शिष्यवृत्ती देणार - विनोद तावडे

भोसरी, दि. २९ - अहिराणी भाषेमध्ये प्रचंड साहित्य येत आहे. अहिराणी भाषा केवळ बोली भाषा राहता इतर ठिकाणी देखील आली पाहिजे. यापुढे अहिराणी भाषेवर संशोधन करणा-या तरुणांना राज्य सरकारतर्फे शिष्यवृत्ती देण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे सांस्कृतिक शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आज (रविवारी) भोसरीत केली.

भोसरी येथील अंकुशराव लांडगे सभागृहात पिंपरी-चिंचवड महापालिका आणि खान्देश अहिराणी कस्तुरी साहित्य, सांस्कृतिक, कला-क्रीडा मंच पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या एकदिवसीय राज्यस्तरीय अहिराणी साहित्य संमेलनाचे उद्घाटन तावडे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापौर नितीन काळजे होते. संमेलनाध्यक्ष सुप्रसिद्ध साहित्यिक वि. दा. पिंगळे, आमदार महेश लांडगे, स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे, सत्तारूढ पक्षनेता एकनाथ पवार, विरोधी पक्षनेता योगेश बहल, महापालिका आयुक्त श्रावण हार्डीकर, संमेलनाचे स्वागताध्यक्ष नगरसेवक नामदेव ढाके आदी उपस्थित होते.

प्रत्येक बोलीभाषा टिकविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे. जुन्या पिढीला बोलीभाषेविषयी थोडीशी तरी माहिती असते. परंतु, नवीन पिढी यापासून अज्ञान राहत आहे. अहिराणी ही भाषा हजार वर्षांपूर्वीची आहे. महाराष्ट्रातील जळगाव, धुळे, नंदूरबार, नाशिक या भागापूरतीच ही भाषा मर्यादित नसून राजस्थानमध्येही अहिराणी बोलली जाते. अहिराणी भाषेचा गोडवा इतका की, समोरच्याने आपल्याला शिवी जरी दिली. तरी ती पुन्हा ऐकाविशी वाटते, असे तावडे म्हणाले.

खान्देशात साने गुरुजी, कवियित्री बहिणाबाई चौधरी यांनी आपल्या बोलण्यातून गाण्यांमधून अहिराणी भाषेची जोपासणा केली. अहिराणी भाषेचा गवगवा हा नुसताच खानदेशात नसून तर संपूर्ण देशभरात आहे. या भाषेच्या संर्वधनासाठी तसेच अहिराणी भाषा वृद्धींगत होण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही, ते म्हणाले.