ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

नाशिक महामार्ग रुंदीकरणासाठी पिंपरी पालिका भूसंपादन करणार

भोसरी, दि. ७ - पुणे-नाशिक महामार्ग रुंदीकरणासाठी आवश्यक असणारी भोसरी ते मोशी दरम्यानची जमीन पिंपरी-चिंचवड महापालिका संपादीत करणार आहे. या महामार्गावरील मालमत्ताधारकांनी स्वेच्छेने जमीन ताब्यात देण्याचे आवाहन पिंपरी महापालिकेतर्फे करण्यात आले आहे. 

पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६० मधील नाशिक फाटा ते इंद्रायणी नदी, मोशी दरम्यानचा रस्ता हा पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत आहे. या महामार्गावरील भोसरी येथील रोशल गार्डनपासून ते इंद्रायणी नदीपर्यंत रस्ता रुंदीकरण करण्यात येणार आहे. त्यामध्ये रोशल गार्डन ते स्पाईन रोड चौक या २२०० मीटर रस्त्याचे ६१ मीटर, तर स्पाईन रोड चौकापासून इंद्रायणी नदी, मोशीपर्यंत ४४०० मीटर रस्त्याचे ६० मीटर रुंदीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी या दरम्यानच्या जमीनींचे संपादन पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे करण्यात येणार आहे. 

या रस्ता रुंदीकरणासाठी आवश्यक असलेली जमीन संबंधित रस्ताबाधित मालमत्ताधारकांनी प्रपत्र '' ''च्या माध्यमातून आगावू महापालिकेच्या ताब्यात द्यावी. जेणेकरून रस्ताबाधितांना देण्यात येणारा मोबदला एमएसआय, टिडीआर, डीआर किंवा खासगी वाटाघाटीच्या माध्यमातून महापालिकेच्या प्रचलित नियमाप्रमाणे दिला जाईल. 

संबंधित मालमत्ताधारकांनी स्वेच्छेने ही जमीन महापालिकेच्या ताब्यात देवून महापालिकेच्या नावे प्रतिकात्मक ताबापावती करून द्यावी. तसेच अधिक माहितीसाठी महापालिका नगररचना विकास विभागाचे उपसंचालक यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केले आहे.