ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

भाविक नागरिकांची तहान भागविणे म्हणजे राजकीय स्टंट नव्हे - वैजयंता उमरगेकर

पिंपरी, दि. ७ - पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून आळंदीला पिण्याचे पाणी उपलब्द्ध करून देणे हा राजकीय स्टंट नाही. महापालिकेने पुरवलेल्या पाण्यामुळे अवघ्या आळंदीकरांची तहान भागात आहे. पिंपरी-चिंचवडच्या उपलब्द्ध पाणी साठ्यातून आळंदी शहराला दोन लक्ष लिटर पिण्याचे पाणी नियमित मिळत असल्याने महापालिकेच्या निर्णयाचे स्वागत आळंदीत होत असल्याचे नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर (कांबळे) यांनी सांगितले. 

पिंपरी-चिंचवडला ज्या धरणातून पाणीपुरवठा होतो, त्या धरणांमध्ये कमी पाणीसाठा असताना देखील महापालिकेने मे महिन्यातसुद्धा आळंदीला पाणी दिले. हा पालिकेचा प्रामाणिक आणि उदात्त हेतू आहे. त्यामागे कसलाही राजकीय स्टंट नाही. महापालिकेने पाणीपुरवठ्याच्या निर्णयाला यश आल्याने विरोधकांकडून या विषयावर नाहक टीका होत आहे. 

आळंदीत आलेले पाणीसंकट पाहून उमरगेकर यांनी महापालिका महापौर नितीन काळजे, आयुक्त श्रावण हर्डीकर, आमदार महेश लांडगे यांच्यासमोर हा प्रश्न मांडला. मागणीची तातडीने दखल घेत आळंदी, चिखली, तळवडे, मोशी भागाची तसेच इंद्रायणी नदीचा पाहणी दौरा करून पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आणि नियमित दोन लाख लिटर पाणी आळंदीला पालिकेकडून येऊ लागले. त्यामुळे आळंदीतील पाणी समस्येवर मोठ्या प्रमाणात आळा बसला. यापूर्वीच्या सरकारने सतत पाठपुरावा करून तांब्याभर पाणी दिले नव्हते, असे म्हणत उमरगेकर यांनी विरोधकांना टोला मारला. 

येत्या काळात जर समाधानकारक पाऊस पडला तर आळंदीला देण्यात येणा-या पाण्यात वाढ करणार असल्याचे महापौर नितीन काळजे यांनी सांगितले. तसेच इंद्रायणी नदीला प्रदूषणमुक्त करण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न करणार असल्याचेही ते म्हणाले. आषाढी यात्रेच्या दरम्यान संपूर्ण राज्यातून वारकरी आळंदीकडे येत असतात. त्यांची योग्य सोय होण्याकरिता चांगल्या रस्त्यांची निर्मिती करण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या बांधकाम विभागाकडे वेळोवेळी पाठपुरावा करण्यात येत असून भाविक नागरिक यांना चांगल्या सोयी मिळाव्या यासाठी करण्यात येणारे केवळ प्रामाणिक प्रयत्न असून यात स्टंटबाजीला कसलाही थारा नाही, असेही उमरगेकर म्हणाल्या.