ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

बोपखेलमध्ये नववीच्या मुलाची गळफास घेऊन आत्महत्या

भोसरी. दि. १० - बोपखेलमध्ये एका १६ वर्षीय मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना शुक्रवारी (दि. 9) संध्याकाळी पाचच्या सुमारास घडली. आत्महत्येमागचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. महेश नागेंद्र शेट्टी (वय १६ रा. बाराते वस्ती, पंचशील नगर, बोपखेल) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. 

भोसरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप कुलकर्णी यांनी याबाबत माहिती दिली. महेश खडकी येथील एस.. या शाळेत नववीच्या वर्गात शिकत होता. महेश शुक्रवारी संध्याकाळी त्याच्या आजी सोबत घराच्या वरच्या खोलीत झोपला होता. दरम्यान, आजी काही कामानिमित्त खाली आली असता महेशने साडीच्या सहायाने गळफास घेऊन आत्महत्या केली. घटना घडली त्यावेळी घरात महेशचे आई-वडील देखील होते. महेशच्या वडिलांचा भाजी विक्रीचा व्यवसाय आहे. पोलीस पुढील तपास करीत आहेत.