ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

दिंडीत सहभागी होणारे आयटीयन्स गिरवत आहे टाळ-मृदुंगाचे धडे

भोसरी, दि. १२ -   दरवर्षीप्रमाणे यंदाही आयटीयन्स आयटी दिंडी वारीमध्ये सहभागी होणार आहे. त्यासाठी आत्तापासूनच जय्यत तयारी सुरू झाली असून नवख्या आयटी वारक-यांसाठी प्रशिक्षण शिबिरे घेतली जात आहेत. यंदा ही वारी भारतीय जवांनासाठी निघणार आहे. यासाठी त्यांचे ब्रीदवाक्यही 'जय जवान संगे हरिनाम रंगे', असे असणार आहे.

वारी म्हणजे शहरातील वाहतुकीचे मार्ग बदलणार किंवा शहरात आज ट्राफिक असणार, असे मानता आयटी क्षेत्रात असूनही त्याचा आनंद घेण्यासाठी या आयटी वारीची निर्मिती झाली. ही आयटी वारी २००६ मध्ये अवघ्या तीन ते चार लोकांनी एकत्र येऊन सुरू केली होती. हे वारीचे ११ वे वर्ष असणार आहे. यंदा सुमारे हजार २०० आयटीयन्स यामध्ये सहभागी होणार असल्याचा अंदाज आहे. या नवख्या वारक-यांसाठी पुण्यामध्ये वारी प्रशिक्षण शिबिरे आयोजित केली जात आहेत.

याविषयी एमपीसी न्यूजशी बोलताना आयटीवारीचे वारकरी अजय भजने म्हणाले की, आयटी क्षेत्रात असूनही एका दिवसात वारीचा अनुभव देणारी, दैनंदिन व्यवहारातून वेगळेपण अनुभवयला मिळते यातूनच ही वारी सुरू झाली. या प्रशिक्षणामध्ये आम्ही टाळ कसा वाजवायचा, त्याचा ताल कसा धरायचा, पाऊल कसे खेळायचे, गजर कसा करायचा आदीचे शिक्षण देतो. यावर्षी आमचे 4 मृदूंग वादक, 30 ते 40 टाळकरी, ध्वज, पताका धारक असे सर्व पारंपारिक वारकरी वेशात असणार आहेत.तसेच दरवर्षीप्रमाणे यंदाही वारी भारतीय जवानांसाठी निघणार आहे. त्यामुळे यावेळी ब्रीदवाक्यही जय जवान संगे हरिनाम रंगे, असे असणार आहे. त्यामुळे आम्ही वारीत सहभागी होणा-याकडूंन जे शुल्क घेतो त्यातून जवानांना मिठाई वाटप करणार आहोत, असेही भजने यांनी सांगितले.

ही दिंडी ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोबत आळंदी ते पुणे हडपसर ते सासवड या दोन मार्गाने जाते. या दिंडीसाठी www.waari.org  संकेतस्थळ तयार करण्यात आले आहे. जिथे केवळ आयटीमधलेच नाही तर इतर क्षेत्रातील नोकरदारही नोंदणी करू शकतात. तिथे वारीसंदर्भात सर्व माहिती देण्यात Posted On: 12 June 2017