ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

बोपखेलवासियांसाठी तात्पुरता पूल उभारा, उच्च न्यायालयाचे महापालिकेला आदेश

बोपखेल, दि. १४ - पिंपरी-चिंचवड महापालिकेने बोपखेलवासियांसाठी तात्पुरता पुल दोन महिन्यात उभारावा. त्यासाठी जुन्या तात्पुरत्या पुलाशेजारील जागा निवडावी. स्थानिक खासदार, आमदार, नगरसेवक आणि अधिका-यांनी तात्पुरता पूल उभारण्यासाठी प्रयत्न करावेत. तसेच कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरींग (सीएमई) क्षेत्राबाहेर कायमस्वरुपी उड्डाणपूल बांधावा, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती व्ही.एम.कानडे आणि न्यायमूर्ती सी. व्ही. भडंग यांनी दिले.

बोपखेलवासियांना सीएमईच्या हद्दीतून ये - जा करण्यास संरक्षण खात्याने मनाई केल्याने रहिवाशांना नाहक हाल सहन करावे लागत आहेत. नागरिकांना आळंदी - पुणे रस्त्यावरून १६ ते २० किलोमीटरचा वळसा घालून बोपखेल गावात ये - जा करावी लागत आहे. बोपखेलमध्ये राहणा-या विद्यार्थ्यांना शाळा, महाविद्यालयांमध्ये ये - जा करताना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

या पार्श्वभूमीवर शिवसेना महिला आघाडीच्या पिंपरी शहरसंघटक मंगला घुले यांनी याचिका दाखल केली आहे. बोपखेलवासियांसाठी वहिवाटेचा रस्ता पुन्हा सुरु करावा अशी मागणी याचिकेद्वारे मंगला घुले यांनी केली आहे. या याचिकेत पिंपरी-चिंचवड महापालिका, केंद्र सरकार आणि राज्य सरकारला प्रतिवादी करण्यात आले आहे. या याचिकेवर नुकतीच सुनावणी झाली. मंगला घुले यांच्या वतीने ज्येष्ठ विधीज्ज्ञ पी.बी.शहा यांनी बाजू मांडली.

बोपखेलची लोकसंख्या ५० हजार आहे. महापालिकेने कोणत्याही सोयी सुविधा बोपखेलवासियांना पुरविल्या नाहीत. या ठिकाणी बससुविधा अथवा प्राथमिक दवाखाना नाही. रुग्णसेवेसाठी रहिवाशांना ३० किलोमीटर अंतरावर जावे लागते, अशी वस्तुस्थिती ॅड. शहा यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. त्यावेळी महापालिकेने तातडीने बससेवा सुरु करावी.