ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

वारक-यांच्या स्वागतासाठी आळंदी देवस्थान सज्ज

आळंदी, दि. १५ - आषाढ वारीसाठी अवघे तीन दिवस उरले आहेत. आळंदी देवस्थानच्या वतीने आषाढ वारीच्या महिनाभराच्या  प्रवासातील लागणा-या मानपान पालखी सोहळ्यातील लवाजमा साहित्याची जमवाजमव पूर्ण करण्यात आली असून    वारक-यांच्या स्वागतासाठी आळंदी देवस्थान प्रशासन सज्ज आहे, अशी माहिती देवस्थानचे व्यवस्थापक श्रीधर सरनाईक यांनी दिली.

याविषयी अधिक माहिती देताना सरनाईक म्हणाले की, पालखीची जय्यत तयारी केली आहे. जुन्या चांदीच्या रथातून श्रीची पालखी पंढरीस जाणार असल्याचा निर्णय झाला आहे. या रथाच्या देखभाल आणि दुरुस्तीचे काम पूर्ण झाले आहे. या शिवाय या सोहळ्यासाठी लागणारे साहित्य सुई-दोऱ्यापासून ते पूजेचे साहित्य, सोहळ्यातील मानक-यांच्या भोजन व्यवस्थेसाठी लागणारे किराणा साहित्य, वाहतूक व्यवस्था, बैठक व्यवस्था, श्रींचा वैभवी तंबू , पोशाख, पूजा साहित्य, विद्युत व्यवस्थेचे साहित्य, संपर्काच्या अत्याधुनिक साहित्यापर्यंत सर्व प्रकारचा साहित्याने श्रींची कोठी तयार आहे.

नगरपरिषदेच्या माध्यमातून जंतूनाशक फवारणी केली जाणार आहे. यात्रा काळात भाविकांना माउली बाग आणि मंदिराबाहेर पिण्यासाठी शुद्ध पाण्याची सोय केली आहे. याशिवाय जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पालखी मार्गावर प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून पाचशे फिरती शौचालये उभारली जाणार आहेत. त्याच बरोबर प्रशासन सज्ज झाले आहे. रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहेत. त्याचबरोबर अनेक स्वयं सेवक ही मदतीला असणार आहेत, अशी माहिती नगरपरिषद मुख्याधिकारी यांनी दिली.

आळंदी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी समीर भूमकर यांनी सुरक्षेविषयी अधिक माहिती देताना, मंदिर आणि पालखी मार्गावर भाविकांना सोयी देण्याबरोबर सुरक्षितता पुरविण्यासाठी जादा पोलीस बंदोबस्त आणि सीसीटीव्ही यंत्रणा बसवली आहे, असेही त्यांनी सांगितले. मंदिर आणि महाद्वारात सुमारे ९६ सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहे. याशिवाय देवस्थानचे स्वतःचे सुरक्षा गार्ड आणि संपर्कासाठी २४ वॉकीटॉकी सज्ज आहेत. प्रस्थान काळात मंदिर आणि महाद्वारात पोलिसांचा जादा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. याशिवाय आळंदी नगरपालिकेतर्फे वारकऱ्यांना २४ तास पाणी, आरोग्य सेवा, मुक्त शौचालये, अग्निशमनचे वाहन इंद्रायणी Posted On: 15 June 2017