ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

बेकारीच्या नैराश्यातून युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

भोसरी, दि. १६ - येथील ३० वर्षीय युवकाने नोकरी-कामधंदा नसल्याच्या नैराश्यातून राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना आज (गुरुवारी) पहाटेच्या सुमारास घडली. विशाल सिताराम गायकवाड (वय ३० रा. गुळवेवस्ती, भोसरी) याने पहाटेच्या सुमारास राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. सकाळी तो उशिरापर्यंत उठला नाही म्हणून खोलीचा दरवाजा उघडला असता हा प्रकार उघडकीस आला.

भोसरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाल याला नोकरी किंवा कोणताच कामधंदा मिळत नव्हता. त्यामुळे त्याने नैराश्यातून आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. याबाबत अधिक तपास भोसरी पोलीस करत आहेत.