ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

एमआयडीसी भोसरीमधील फायबर कंपनीला भीषण

भोसरी, दि. १९ - एमआयडीसी भोसरी येथील सुवर्ण फायब्रोटेक या फायबर कंपनीला पहाटे साडेतीनच्या अचानक आग लागली. ही आग विझवण्यासाठी अग्निशामक दलाच्या १२ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या.शर्थीच्या प्रयत्नानंतर तीन तासांनी ही आग आटोक्यात आली. या आगीचे कारण अद्याप कळाले नसून कंपनीच्या इमारतीमधील पहिल्या मजल्यावरील पाठीमागच्या बाजूने आगीला सुरुवात झाली.या ठिकाणी काही केमिकल होते. त्या केमिकलने आग पकडल्यामुळे आग पसरली. या आगीत कोणतीही जीवित हानी झालेली नाही. मात्र संपूर्ण कंपनी यामध्ये जाळून खाक असून लाखों रुपयांचे नुकसान झाले आहे.

ही आग विझवण्यासाठी पिंपरी, राहटणी, एमआयडीसी भोसरी, प्राधिकरण, तळवडे, खडकी, पुणे तसेच टाटा मोटर्स या सर्व मिळून एकूण १२ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. सध्या आग नियंत्रणात आली असून फक्त धूर येत आहे. फायबर असल्यामुळे आग पूर्णपणे विझवण्यास 2 तास लागतील त्यासाठी सध्या गाड्या घटनास्थळी थांबल्या आहेत, अशी माहिती पिंपरी अग्निशामक दलाचे प्रमुख अधिकारी किरण गावडे यांनी दिली.