ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

आळंदीतून १७ वर्षीय मुलगा व इसम बेपत्ता

आळंदी, दि. २२ - खेड तालुक्यातील मरकळ येथील त्रिवेणी आश्रमातून एका अल्पवयीन मुलाला कोणीतरी अज्ञात इसमाने पळवून नेले आहे, याप्रकरणी संजीव मोहन रावते (वय ४५ वर्ष, रा.त्रिवेणी आश्रम, मरकळ) यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तर लोणावळ्यातून आळंदी येथे लग्नास आलेली ४७ वर्षीय व्यक्ती मंगल कार्यालयातून बेपत्ता आहे. या प्रकरणी प्रकाश माणिक हजारे (वय ४० वर्ष, रा. लोणावळा) यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 

सुमनचंद डोंगल गुपू (वय १७ वर्ष, रा. त्रिवेणी आश्रम, मरकळ, ता.खेड, मुळगाव पंतनगर, घाटकोपर, मुंबई ७५), असे पळवून नेलेल्या मुलाचे नाव आहे. त्याचे वर्णन रंग गोरा, उंची १६० सेमी, हातात प्लास्टिकचे घड्याळ, अंगात निळ्या रंगाचा टी शर्ट निळ्या रंगाची जीन्स पॅन्ट परिधान केली आहे.

या वर्णनाचा मुलगा कोणास आढळल्यास दूरध्वनी क्रमांक ०२१३५0 - २३२२१४ येथे संपर्क साधण्याचे आवाहन आळंदी पोलीस ठाण्याच्या वतीने करण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक आर. एस. पाटील करीत आहेत.

व्यंकटेश केरबा हजारे (वय ४८ वर्ष, रा. लोणावळा, ता.मावळ, जिल्हा पुणे), असे मंगल कार्यालयातून बेपत्ता झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

या गृहस्थांचा रंग गोरा, अंगाने सडपातळ, कपाळ सपाट, केस लहान, उंची पाच फूट आठ इंच, अंगावर लाल रंगाचा चॉकलेटी शर्ट, काळ्या रंगाची जीन्स पॅन्ट परिधान केलेली आहे. या वर्णनाची व्यक्ती कोणास आढळल्यास दूरध्वनी क्रमांक ०२१३५ - २३२२१४ येथे संपर्क साधण्याचे आवाहन आळंदी पोलीस ठाण्याच्या वतीने करण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस नाईक एस.जी.सोनवणे करीत आहेत.