ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

ईदची वर्गणी दिली नाही म्हणून एकावर वार, परस्पर विरोधी गुन्हा दाखल

भोसरी, दि. २४ - रमजान ईदची वर्गणी दिली नाही म्हणून दापोडी येथे एकावर वार केल्याची घटना काल (शुक्रवारी) रात्री साडे नऊ वाजता घडली. या घटनेत नुर रशीद बदनकारी (वय २८ रा. न्यू गुलाब नगर, दापोडी) असे जखमीचे नाव आहे.

जखमीने फिरोज शेख, जुबेदा शेख, ईब्राहीम शेख त्यांचे साथीदार असे मिळून ११ जणांविरुद्ध भोसरी पोलीस ठाण्यात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार दिली आहे.यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, ईदसाठी वर्गणीची मागणी केली असता वर्गणी देण्यास नकार दिल्याने आरोपींनी त्यांच्यावर तलवारीने वार केले. तर मुन्ना उर्फ मोहीद्दीन रफीख (वय २२ रा, दापोडी) यांनी नुर शेख त्यांच्या साथीदाराविरुद्ध परस्परविरोधी तक्रार दिली आहे.

याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हा दाखल झाला असून भोसरी पोलीस अधिक तपास करत आहेत.