ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

मोशी चौकातून १२ किलोचा गांजा जप्त, तिघांना अटक

भोसरी, दि. २७ - देहूफाटा येथील मोशी चौकातून आज पहाटे पाचच्या सुमारास एमआयडीसी भोसरी पोलिसांनी १२ किलोचा गांजा जप्त केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. सचिन शिंदे (वय ३१ रा. खेड, शिवापूर), प्रफुल्ल मारुती सुर्वे (वय ३०), विकास कोंडे (वय २३ तिघेही राहता खेड शिवापूर), अशी अटक आरोपींची नावे आहेत.

संगमनेरवरून खेड शिवापूरला जाणारी पांढ-या रंगाची मारुती अल्टो (एमएच १२ एनयू ४२१३) गाडी गस्त घालणा-या पोलिसांनी संशयावरून अडवली. तपासणी केली असता गाडीत लाख किमतीचा १२ किलो वजनाचा गांजा जप्त करण्यात आला. सचिन शिंदे हा गाडीचा मालक असून तो ग्रामीण भागात गांजा विक्रीचे काम करतो, असे उघड झाले आहे.
याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.