ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

कोणत्या वस्तूला किती टक्के जीएसटी, डाउनलोड करा अॅप

भोसरी, दि. १ - मोठ्या गाजावाजात जीएसटी करप्रणाली काल, शुक्रवारी देशाला समर्पित करण्यात आली. मात्र अजूनही जीएसटी म्हणजे काय ? त्याचे फायदे-तोटे काय ?सर्वात महत्वाचे म्हणजे या करामुळे कोणत्या वस्तू स्वस्त होणार ? कोणत्या महाग होणार? याची उत्सुकता उद्योजक, व्यापारीवर्ग आणि सर्वसामान्य नागरिक याना पडलेला आहे. याबद्दलची माहिती वर्तमानपत्रे, समाजमाध्यमे यामधून दिली जात आहे. हळू हळू या शंकाकुशंका दूर होतील या करीता 'जीएसटी रेट गाईड' नावाचे एक ऍप विकसित करण्यात आले असून यामध्ये नागरिकांना प्रत्येक वस्तू सेवेला किती टक्के जीएसटी आकारण्यात येणार आहे याची सविस्तर माहिती मिळू शकेल.

जीएसटी लागू झाल्यावर फक्त तीन टॅक्स भरावे लागतील.

सेंट्रल जीएसटी - हा कर केंद्र सरकार वसूल करेल,

स्टेट जीएसटी - हा कर राज्य सरकारे त्यांच्या राज्यातील करदात्यांकडून वसूल करतील.

एकत्रित जीएसटी - हा दोन राज्यातील व्यापारावर कर लागू होईल.

जीएसटी अर्थातच वस्तू आणि सेवा कर हा संपूर्ण देशभरात आजपासून लागू करण्यात आला आहे. यामुळे व्हॅटसह इतर सर्व कर रद्द होणार आहेत . सध्या देशात केंद्र आणि राज्य सरकारांचे २० हून अधिक विविध कर करदात्याला भरावे लागतात. जीएसटी लागू झाल्यावर या सगळ्या करांची जागा फक्त एकच कर घेणार आहे तो म्हणजेजीएसटी’. या करप्रणालीमुळे सेंट्रल सेल्स टॅक्स, सेवा कर, एक्साइज टॅक्स, लक्झरी टॅक्स, मनोरंजन कर, व्हॅटसारखे सर्व कर रद्द होणार आहेत. ही करप्रणाली लागू झाल्यानंतर केंद्र आणि राज्यसरकारला यातील समान वाटा मिळणार आहे. ‘वन नेशन वन टॅक्सया संकल्पनेवर जीएसटी आधारित आहे.

जीएसटी मुळे बँकिंग, टेलिकॉम सेवा, फ्लॅट, दुकान खरेदी, तयार कपडे, महिन्याचे मोबाईल बिल, एसी रेस्टॉरंटमधले खान-पान, सलून, आणि टयुशन फी महागणार आहेया नव्या करप्रणालीची सविस्तर माहिती तुम्हाला खालील लिंक तुमच्या स्मार्ट फोनवर डाउनलोड केल्यानंतर 'जीएसटी रेट गाईड' या अॅप Posted On: 01 July 2017