ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

विश्रांतवाडीत खाणीतील पाण्यात युवक-युवतीचा मृतदेह

विश्रांतवाडी, दि. ३ -   अंबानगरी येथे दगडाच्या खाणीत साठलेल्या पाण्यामधे अंदाजे २५ वर्ष वयाच्या युवक युवतीचा मृतदेह अग्निशमन दलाच्या जवानांनी बाहेर काढला.आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास अग्निशमन दलाकडे पाण्यामध्ये युवक युवतीचा मृतदेह असल्याची बातमी मिळाली होती. त्यानंतर अग्निशामक दलाच्या जवानांमी घटनास्थळी धाव घेत दोन्ही मृतदेह बाहेर काढले.

यातील मृत मुलाचे नाव सनी जगताप (वय अंदाजे २४) तर मुलीचे नाव अद्याप कळू शकले नाही. दोघेही राहणार विश्रांतवाडीतीलच असल्याची प्राथमिक माहिती आहे. दोन्ही मृतदेह पोलिसांच्या ताब्यात दिले असून अधिक तपास सुरू आहे.

सकाळी आठ वाजता पोलीस नियत्रण कक्षाला नागरिकांनी माहिती दिली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी मुलीचा मृतदेह पाण्यावर तरंगत होता. पोलिसानी अग्निशामक दलाला माहिती दिली. अग्निशामक दलाने येऊन मुलीचा मृतदेह बाहेर काढला. त्यांनतर दीड तास मुलाचा शोध घेतल्यांनतर मुलाचा मृतदेह आढळून आला. मुलाच्या खिशात मुलीचा फोटो आढळून आला आहे

मुलीची ओळख पटवण्याचे काम सुरु आहे. मात्र अजून तिची ओळख पटू शकलेली नाही.