ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

च-होली येथील ४ वर्षाच्या अपहृत चिमुरडीची हत्या

-होली, दि. ४ -होली येथील वडमुखवाडी मधून वर्षाची  चिमुरडी २८ जूनपासून बेपत्ता झाली होती. तीचा खुन करुन मृतदेहाची विल्हेवाट अकोला जिल्ह्यात केल्याचे तपास समोर आले असून मृतदेह ताब्यात घेण्यासाठी दिघी पोलिसांचे एक पथक अकोला येथे रवाना झाले आहे.

तनिष्का आमोल आरुडे (रा, साईनगर, वडमुखवाडी, -होली) ही घरात खेळत असताना २८ जून पासून बेपत्ता झाली होती.याप्रकरणी दिघी पोलीसांनी दोन संशयीतांना ताब्यात घेतले आहे.
विश्वसनीय सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुलीचा दिघीमध्येच खून करुन मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी अकोला येथे नेला होता. घटनास्थळी दिघी पोलीसांचे एक पथक रवाना झाले असून मृतदेह शोधण्याचे काम सुरु आहे. या मुलीचा खून नेमका कोणत्या कारणामुळे करण्यात आला हे अद्याप स्पष्ट झाले नाही. त्यामुळे मृतदेह सापडल्यानंतर त्याची उत्तरीय तपासणी झाल्या नंतरच सर्व चित्र स्पष्ट होणार आहे. तसेच तनिष्काचा खुन करुन तिचा मृतदेह जाळून पुरण्यात आला असल्याचेही समजतेय.

याप्रकरणी दिघी पोलीस अधिक तपास करत आहेत.