ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

डॉक्टरच्या बनावट सह्या करून नशेची औषधे घेणा-यास अटक

भोसरी, दि. ६ - सह्याद्री हॉस्पिटलमध्ये वॉर्डबॉयचे काम करत असताना नशेच्या औषधांची सवय लागल्यानंतर दिनानाथ रुग्णालयातील एका डॉक्टरची बनावट सही करून त्याद्वारे रुग्णालयातील मेडीकल स्टोअरमधून औषधे घेऊन नशा करणा-या एका इसमाला अलंकार पोलिसांनी अटक केली. सिजी जॉर्ज जॉन (वय-32, रा. सध्या येरवडा, मुळ केरळ) असे आरोपीचे नाव आहे. अलंकार पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, आरोपी हा पूर्वी सह्याद्री हॉस्पिटलमध्ये वॉर्डबॉयचे काम करत असे. त्यामुळे त्याला नशा आणणा-या औषधांविषयी संपूर्ण माहिती होती. तो नशेच्या आहारी गेल्यामुळे त्याला सह्याद्री हॉस्पिटलमधून काढून टाकण्यात आले होते. नशेची सवय लागली असलल्याने त्याने दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या ओपोडी मधून डॉ. निनाद देशमुख यांच्या नावाचे प्रीस्क्रीपशन लेटर चोरी करून त्यावर नशेच्या औषधांची नावे स्वत: लिहून त्या खाली डॉ. निनाद देशमुख यांची बनावट सही करून औषधांची खरेदी केली होती. हा प्रकार दोन-तीन वेळेस घडला. त्यानंतर रुग्णालयातील कर्मचा-यांना या इसमाचा संशय आल्याने त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले.