ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

येरवडा कारागृहात कैद्याचा डोक्यात दगड घालून खून

येरवडा, दि. ८ - येरवडा मध्यवर्ती कारागृहात एका कैद्याने दुसऱ्या कैद्याच्या डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना शनिवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली. येरवडा पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. हा प्रकार कारागृहातील बी यार्ड मध्ये हा प्रकार झाल्याचे समजतेय. बी यार्ड मध्ये गुन्हेगारी क्षेत्रातील कैद्यांना ठेवण्यात येते.
सुखदेव मेघराज महापूर असे खून झालेल्या कैद्याचे नाव आहे
.

प्राथमिक माहितीनुसार, हे दोन्ही कैदी स्वयंपाक घरात काम करीत होते. त्यांच्यामध्ये काही कारणावरून वादावादी झाली होतीलक्ष नसताना पाठीमागून दगडाने हल्ला करून दुसऱ्या कैद्याचा खून करण्यात आला आहे. कारागृह प्रशासनाने पोलिसांना माहिती काळविल्यानंतर येरवडा पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे.