ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

घऱफोडी करणारे दोन आरोपी भोसरी एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात

भोसरी, दि. ११ - मोशी येथील मोबाईलच्या दुकाची घऱफोडी करणाऱ्या दोन आरोपीना एमआयडीसी भोसरी पोलिसांनी अटक केली आहे. या दोघांना पोलिसांनी मोशी येथून जुलै रोजी ताब्यात घेतले आहे. करण कुमार जाधव (वय २१ रा. मोशी) निलेश सुनील पवार (वय २२ रा. आदर्शनगर, मोशी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

काही दिवसांपूर्वीच मोशी येथील आदर्शनगर भागातील वेदिका मोबाईल शॉपी फोडून मोबाईल, चार्जर, रोख रक्कम असा सुमारे ५० हजारांचा ऐवज चोरीला गेला होता. त्याचा तपास करत असताना पोलीस कॉन्सटेबल नवनाथ पोटे यांना मिळालेल्या बातमीनुसार एमआयडीसी भोसरी पेलिसांनी मोशी येथे जाऊन दोघांनाही राहत्या घरुन ताब्यात घेतले. यामध्ये पोलिसांनी चोरीला गेलेला २५ हजारांचा माल चोरीसाठी वापरलेला निलेशच्या मालकीचा सहाआसनी प्रवाशी रिक्षा जप्त केला आहे.

ही कारवाई एमआयडीसी भोसरीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमराव शिंगाडे, पोलीस निरीक्षक गुन्हे दिलीप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक वसंत मुळे, पोलीस नाईक किरण काटकर, पोलीस कॉन्स्टेबल नवनाथ पोटे, विजय दौंडकर यांच्या पथकाने केली. दोघांविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक वसंत मुळे करत आहेत.