ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

भोसरी येथे मसाज सेंटरच्या नावाखाली सेक्स रॅकेट

भोसरी, दि. १२ - भोसरीतील अनुष्का आयुर्वेदिक मसाज सेंटर नवाखाली सेक्स रॅकेट चालवणाऱ्या महिलेचा काल (मंगळवारी) भोसरी पोलिसांनी छाप टाकून पर्दाफाश केला. यामध्ये तीन महिलांची सुटका करण्यात आली.

अल्का अजय कदम (वय २७) असे अटक महिला आरोपीचे नाव असून ती हे पार्लर चालवत होतीभोसरी येथील जय गणेशनगर येथील साईगंगा अपार्टमेंटमध्ये अनुष्का आयुर्वेदिक मसाज सेंटर चालू होते. मात्र पोलिसांना आधीपासून यावर संशय होता. खबऱ्याकडून माहिती मिळताच पोलिसांनी काल सायंकाळी साडेसहाच्या सुमारास तेथे छाप टाकला सर्व प्रकार उघडकीस आला. यावेळी तीन तरुणींना पोलिसानी चैतन्य महिला आश्रमात सोडले तर कदमला अटक केली आहे.

संबंधित महिलेचे बावधन येथे देखील मसाज सेंटर आहे. त्यानुसार या प्रकरणाचा अधिक तपास करण्यात येईल असे भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमराव शिंगाडे यांनी सांगितले.