ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

चाकणचे अपक्ष नगरसेवक प्रवीण गोरे यांचे अपहरण

चाकण, दि. १२ चाकण नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने निर्माण झालेले टोकाचे राजकारण भलत्याच वळणावर पोहचले आहे. चाकण नगरपरिषदेचे अपक्ष नगरसेवक प्रवीण शांताराम गोरे यांचे अपहरण झाल्याची तक्रार त्यांचे भाऊ अमोल गोरे यांनी चाकण पोलिसात दिली आहे. अपेक्षेप्रमाणे मतदान केल्यास ठार मारण्याची धमकी देण्यात आली असल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी रात्री उशिरा एका नगराध्यक्षपदाच्या महिला उमेदवाराच्या दिरावर अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.

अमोल गोरे यांनी चाकण पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार भाऊ प्रवीण गोरे हे चाकण नगर परिषदेचे अपक्ष नगरसेवक आहेत. सध्या चाकण नगर परिषदेची नगराध्यक्ष निवडीची प्रकिया चालू आहे. त्याची निवडणूक शुक्रवारी ( दि. १४ जुलै) आहे

सुमारे १५ दिवसापूर्वी नगरसेवक प्रवीण शांताराम गोरे हे इतर अपक्ष नगरसेवक सुदाम शेवकरी, प्रकाश भुजबळ, धीरज मुटके, भाजपच्या नगरसेविका सुरेखा गालफाडे यांचे चिरंजीव महेंद्र गालफाडे यांच्यासह गोवा येथे फिरायला गेलेले होते.

गोव्याहून त्याची ख्यालीखुशाली घरचे नातेवाईक फोन द्वारे घेत होते. मात्र जुलै नंतर प्रवीण गोरे याचा फोन लागला नाही. त्यामुळे त्याच्या सोबत असणाऱ्या इतर नगरसेवकांना फोन केला असता त्यांचेही फोन लागत नव्हते. अन्य नगरसेवकांच्या नातेवाईकांनीही कोणाचेही फोन लागत नसल्याचे सांगीतले. प्रवीण हा सोबत पासपोर्ट घेऊन गेला होता त्यामुळे कदाचित तो परदेशी गेला असावा असा समज झाला.

दरम्यान, सोमवारी (दि.१० जुलै) दुपारी अनोळखी नंबरवरून प्रवीण गोरे यांनी आम्ही सर्वजण हैद्राबाद येथे असुन आमच्या सोबत राष्ट्रवादीच्या नगरसेविका वैशाली देशमुख यांचा दीर मंदार देशमुख असुन त्याने माझा मोबाईल काढून घेतला आहे तसेच घरी संपर्क करू देत नाही. चाकण नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष निवडणुकीत आमच्या विरोधात मतदान केले तर तुम्हाला जीवे ठार मारुन टाकीन अशी धमकी देत आहे अशी माहिती फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आली आहे.

त्यानंतर संबंधित नंबरवर फोन केला असता प्रवीणचा संपर्क होऊ शकला नाही. Posted On: 12 July 2017