ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

चाकणच्या भुईकोटची तटबंदी ढासळली

पुणे, दि. १७ - चाकणमधील भुईकोट किल्ल्याच्या तटबंदीची डागडुजी ढासळली आहे. पुरातत्त्व खात्याने ही डागडुजी केली होती. विशेष म्हणजे शेकडो वर्षांपूर्वी बांधलेल्या भुईकोट किल्ल्याचं मूळ बांधकाम अजूनही तसंच आहे. मात्र, तीन वर्षांपूर्वींची पुरातत्त्व खात्याने केलेली डागडुजी मात्र ढासळली आहे.

डागडुजी ढासळल्याने इतिहासप्रेमींसह सर्वच स्तरातून पुरतत्त्व खात्याच्या कारभाराबद्दल नाराजी व्यक्त केली जात आहे.

तिकडे पुरतत्त्व खात्याने मात्र या प्रकाराला ठेकेदार जबाबदार असल्याचे सांगितलं आहे. शाहिस्तेखान जेव्हा स्वराज्यावर चाल करुन आला, तेव्हा त्याने चाकणचा हा संग्रामदुर्ग जिंकण्याचा प्रयत्न केला. परंतु खानाच्या वीस हजारांच्या फौजेला फिरंगोजी नरसाळा यांच्या नेतृत्वाखालील अवघ्या चारशे मराठी मावळ्यांनी या संग्राम दुर्ग किल्ल्याच्या साहाय्याने तब्ब्ल ५६ दिवस झुंजवलं होतं. इतिहासात चाकणची लढाई प्रसिद्ध आहे.

काही वर्षांपूर्वी या किल्ल्याच्या तटबंदीच्या काही भागाची डागडुजी पुरातत्त्व खात्याने केली होती. त्यासाठी एक कोटी रुपयांचा निधी देण्यात आला होता. या डागडुजीसाठी एका ठेकेदाराची नेमणूक करण्यात आली होती. परंतु, या ठेकेदाराने काय दर्जाचं काम केलं होतं, हे तीन वर्षातच लक्षात येऊ लागले आहे.