ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

वायसीएमच्या वॉर्डबॉयने रुग्णालाच मारहाण करुन लुटले

पिंपरी, दि. १९पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात उपचारासाठी गेलेलेल्या रुग्णालाच तेथील वॉर्डबॉयने मारहाण करुन लुटले. ही घटना आज (मंगळवारी) मध्यरात्री घडली. यामध्ये आरोपीला पिंपरी पोलिसांनी अटक केली आहे. सुरेंद्र ऊर्फ बंटी विठ्ठल रेणुसे (वय २३ रा. पिंपरी) असे आरोपीचे नाव आहे. लक्ष्मण तुकाराम पळनाटे (वय २२ रा. नेहरुनगर) यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसारपळनाटे त्यांचा मित्र रणजित जाधव हे वायसीएम येथे जखमेवर मलमपट्टी करण्यासाठी गेले असता सुरेंद्रने दमदाटी करत लक्ष्मण याच्या खिश्यातील १५ हजार रुपये काढून घेतले. तसेच त्यांच्या कडील हजार रुपयांचा पॅनासॉनीकचा फोनही काढून घेतला. त्यांना शिवीगाळ मारहाण करत सुरेंद्रने जिवे मारण्याची धमकीही दिली त्याने तेथून पळ काढला.

आरोपीला अवघ्या काही तासात पिंपरी पोलिसांनी अटक केली असून त्याला मोरवाडी न्यायालयात हजर केले असता आरोपीला २१ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी अधिक तपास पिंपरी पोलीस करत आहेत.