ब्रेकिंग न्यूज
उल्हासनगर : रेल्वे स्टेशनबाहेर वडापावच्या दुकान मालकाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, चंदरलाल रामरखियानी 100 % भाजले      पाकिस्तानात बेपत्ता झालेले दोन्ही मौलवी भारतात परतले      बेळगावात ड्राय डेच्या दिवशी दारु न दिल्याने पोलिसांची हॉटेल मॅनेजरला लाथा-बुक्क्यांनी मारहाण      नागपूरमध्ये राजू शेट्टी यांचे स्टेट बँक इंडियाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन      पतीची हत्या करुन मृतदेह बीएमडब्ल्यू गाडीत लपवला, पत्नीविरोधात गुन्हा दाखल, पंजाबमधील घटना      उत्तरप्रदेशमध्ये बहुजन समाज पक्षाचे नेते मोहम्मद समी यांची भररस्त्यात हत्या      छत्तीसगडमधील दंतेवाडामधूल पाच नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा हस्तगत      महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना फसवणारा, जनतेला गाजर दाखवणारा अर्थसंकल्पः जयंत पाटील      जळगाव : शहरापासून जवळच असलेल्या भादली गावात मध्यरात्री एका कुटुंबातील चौघांची चोरटयांनी हत्या केली.      मुंबईने गमावला मतदानाचा अधिकार, ईशान्य भारतातील राज्यांना मिळाला BCCI मध्ये मतदानाचा हक्क
...

चाकणचे तत्कालीन उपसरपंच मंडळांच्या प्रमुखांवर चार वर्षांनी गुन्हा दाखल

चाकण, दि. ४ - रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेड कंपनीने चाकण मध्ये २०१३ ते २०१४ दरम्यान केबल टाकण्याचे काम करताना झालेल्या ६८ लाखांच्या भ्रष्ट्राचार प्रकरणी अखेर चार वर्षांनी चाकण पोलिसांत तत्कालीन उपसरपंच, तत्कालीन ग्रामविकास अधिकारी आणि चाकण मधील सार्वजनिक मंडळांच्या अध्यक्ष सचिवांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे रिलायन्स जिओ कंपनीने दिलेल्या त्या ६८ लाखांच्या डीडीचे रहस्य उलगडणार आहे.

चाकण नगरपरिषदेचे नगरसेवक किशोर ज्ञानोबा शेवकरी (वय ३७ वर्षे, रा.चाकण, ता.खेड, जि.पुणे) यांच्या फिर्यादीवरून तत्कालीन उपसरपंच प्रितम शंकरसिंग परदेशी, तत्कालीन ग्रामविकास अधिकारी दयानंद कोळी, नवनाथ मित्र मंडळाचे तत्कालीन अध्यक्ष, सेक्रेटरी यांच्या विरोधात गु. . नं.७२३/ १७ भा..वि. कलम ४०९, ४२०, ४६४, ४६७, ४६८, ४७१, ४७४, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती चाकण पोलिसांनी दिली.

तत्कालीन सरपंच काळूराम गोरे नोंदींच्या प्रकरणात येरवडा कारागृहात असताना उपसरपंच प्रीतम परदेशी यांच्याकडे सरपंचपदाचे अधिकार होते. त्यामुळे तत्कालीन उपसरपंच परदेशी यांनी रिलायन्स जिओ कंपनीने चाकण हद्दीत खोदकामासाठी दिलेली ६७ लाख ७५ हजारांची रक्कम तत्कालीन चाकण ग्रामपंचायतला देता परस्पर चाकण येथील नवनाथ मित्र मंडळाच्या राजगुरुनगर सहकारी बँक (शाखा चाकण) लाला अर्बन को.. बँक (शाखा चाकण) येथील खात्यावर जमा केली

संबंधित मंडळाचे तत्कालीन अध्यक्ष, सेक्रेटरी यांच्या संगनमताने संबंधित रक्कम वेगवेगळ्या खात्याद्वारे काढून घेतली. नंतर तत्कालीन ग्रामसेवक डी.जी. कोळी रिलायन्स जीओ कंपनीशी संगनमत करून बनावट, खोटा दस्तएवज खरे असल्याचे भासवून ६७ लाख ७५ हजार मिळालेच नसल्याचे भासविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे संबंधित सर्वांनी तत्कालीन चाकण ग्रामपंचायत शासनाची फसवणूक केलेली असल्याचे किशोर शेवकरी यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले आहे

त्यामुळे ६७ लाख ७५ हजारांच्या रकमेचे नेमके गौडबंगाल काय, हे स्पष्ट झाले आहे. चाकण पोलिसांकडून या संदर्भात अनेकांची चौकशी होण्याची शक्यता आहे Posted On: 04 August 2017