ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

च-होली परिसरात कायम पाणीपुरवठा योजना राबविण्याची मागणी

-होली, दि. ५ - प्रभाग क्रमांक तीन मधील चोवीसवाडी, वडमुखवाडी, बुर्डे वस्ती, पठारे मळा, मोशी, -होली, कोतवाल वस्तीमध्ये २४X पाणीपुरवठा योजना राबविण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका विनया तापकीर यांनी पालिकेकडे केली आहे.

याबाबत पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात म्हटले आहे की, पिंपरी पालिकेतर्फे आठवड्यातील सातही दिवस चोवीस तास पाणीपुरवण्याचे नियोजन आहे. तर, काही विभागामध्ये याचे प्राथमिक काम देखील सुरु झाले आहे. प्रभाग क्रमांक तीन मधील चोवीसवाडी, वडमुखवाडी, बुर्डे वस्ती, पठारे मळा, मोशी, -होली, कोतवाल वस्तीमध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्ग राहत आहे. शेतातील कामासांठी त्यांना शेतात जास्त वेळ थांबावे लागत आहे.

तसेच या परिसरात मोठे गृहप्रकल्प झाल्यामुळे कामगार वर्ग, व्यापारी यांची देखील संख्या जास्त आहे. या नागरिकांना ठराविक वेळेत पाणी भरणे शक्य होत नाही. पाणीही कमी दाबाने येत आहे. त्यामुळे नागरिक पाण्याचा साठा करुन ठेवतात. परिणामी, साठवून ठेवलेल्या पाण्यात डासांच्या आळ्यांची उत्पत्ती होत आहे. त्यामुळे आरोग्याचा प्रश्न गंभीर निर्माण झाला आहे. त्यासाठी प्रभाग क्रमांक तीन मधील चोवीसवाडी, वडमुखवाडी, बुर्डे वस्ती, पठारे मळा, मोशी, -होली, कोतवाल वस्तीमध्ये २४X पाणीपुरवठा योजना राबविण्याची मागणी नगरसेविका विनया तापकीर यांनी निवेदनातून केली आहे.