ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

मोशी येथे चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीवर वार, पतीला अटक

मोशी, दि. ७ - चारित्र्याच्या संश्यावरून पत्नीला भेटायला बोलवून पतीनेच चाकूने पत्नीवर वार केले आहेत. ही घटना काल (शनिवारी) दुपारी चारच्या सुमारास घडली. यामध्ये पत्नी जखमी झाली आहे. फिरोज अली शेख (वय ३० रा. वास्तू उद्योग सोसायटी, अजमेरा, पिंपरी), असे आरोपीचे नाव आहे.

फिरोज फरहाना शेख (वय २६) यांचा वर्षांपूर्वी विवाह झाला होता. त्यांना दोन मुले एक मुलगी असा परिवारही आहे. फिरोज पोटापाण्यासाठी कॅब चालवतो. त्यांच्यामध्ये यापूर्वीही भांडणे झाली होती. त्यानुसार फरहाना हिने पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर फरहाना तिच्या आईकडे मुंबईला गेली होती. काही दिवसांपूर्वी ती पुन्हा पिंपरीत तिच्या सासूकडे राहण्यास आली.

यावेळी फरहानने तिला भेटण्यासाठी म्हणून काल बोलावले. तिला घेऊन तो मोशी प्राधिकरण येथील आरटीओच्या पासिंगच्या गाड्या लागतात. त्या मोकळ्या जागेत घेऊन गेला. तिथे त्याने तिच्याशी वाद घातला. तिला शिवीगाळ केली. हाताने मारहाण केली त्यांनतर तिच्या चेह-यावर पोटावर त्याच्या जवळील चाकूने वार केले. यामध्ये फिरोजने त्याचा वेळीच हात धरला. तसेच आसपासच्या नारगरिकांनी धाव घेतल्याने मोठा अनर्थ टळला.

यामध्ये फरहाना थोडी जखमी झाली असून तिनेच भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात जाऊन पती विरुद्ध तक्रार दिली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस अधिक तपास करत आहेत.