ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

आळंदी येथे धुळ्यातील प्रेमी युगूलाची विष पिऊन आत्महत्या

आळंदी, दि. १२ - आळंदी येथील गोपाळपुरा येथे इंद्रायणी नदीच्या काठी प्रेमी युगूलाने विष पिऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज (शुक्रवारी) दुपारी दीड वाजता उघडकीस आली. राहुल साहेबराव पाटील (वय ३५) तर रिना उर्फ गुड्डी विलास गिरीगोसावी (वय २५) अशी मयतांची नावे असून दोघेही राहणार डागुर्ण, धुळे येथील राहणारे होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रेताजवळ विषारी औषधाची बाटली सापडली असून दोन मोबाईल फोन मिळाले आहेतयासंबंधी चौकशी केली असता महिलेचे लग्न झाले असून दोघेही प्रेमसंबंधातून चार दिवसापूर्वी आळंदी येथे पळून आले होते. याप्रकरणी मयत महिलेने औषध घेण्यापूर्वी नातेवाईकांना फोन करून आत्महत्या करीत असल्याचे कळविले होते, असेही तपासात उघड झाले आहे. त्यानुसार पोलिसांनी मयताच्या नातेवाईकांना कळवले असून आळंदी पोलीस अधिक तपास करत आहेत.