ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

ब्लू व्हेल गेम तातडीने हटविण्याचे केंद्र शासनाचे आदेश

भोसरी, दि. १६ - जीवघेण्या ब्लू व्हेल या गेमची लिंक तातडीने हटविण्यात यावी असा आदेश केंद्र सरकारने गुगल, फेसबुक, व्हॉट्सअप, इन्स्टाग्राम, याहू आणि मायक्रोसॉफ्ट या कंपन्यांना दिले आहेत. त्यामुळे या जीवघेण्या गेमपासून नवीन पिढीच्या आयुष्याला असलेला धोका दूर झाला आहे.

ब्लू व्हेल या गेममध्ये देण्यात येणाऱ्या टास्कमुळे देशात अनेक ठिकाणी आत्महत्येच्या घटना घडल्याचे दिसून आले होते. त्यामुळे या गेमवर बंदी आणण्याची मागणी देशभरातून करण्यात येत होती. नुकत्याच पार पडलेल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनात 'ब्लू व्हेल' गेमवर देशात तात्काळ बंदी घालण्याची मागणी सर्वपक्षीय खासदारांनी सभागृहात केली होती. त्यांच्या या मागणीवर केंद्र सरकारने संभाव्य धोका ओळखून या गेमची लिंक हटविण्याचे आदेश गुगल, फेसबुक, व्हॉट्सअप, इन्स्टाग्राम, याहू आणि मायक्रोसॉफ्ट या कंपन्यांना दिले आहेत.

या गेममुळे देशातील लहान मुलांच्या आयुष्याला धोका निर्माण झाला होता. दुर्दैवाने या गेममुळे काही जणांना आपला जीव गमवावा लागला. या घटनांची गंभीर दखल घेत केंद्र शासनाने या गेमवर बंदी घालून या गेमची लिंक हटविण्याचे आदेश संबंधित कंपन्यांना दिले. खासदार अमर साबळे यांनीही या संदर्भात संसदेमध्ये हा मुद्दा उपस्थित करून या गेमवर बंदी आणण्याची मागणी केली होती.