ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

कल्याणी फोर्जच्या लेखापालाची आत्महत्या, संचालकावर गुन्हा दाखल

चाकण, दि. २१भारत फोर्जमध्ये वरिष्ठ लेखापाल म्हणून काम करणा-या निलेश गायकवाड यांनी आत्महत्या केल्याचे उघड झाले आहेगंधर्व हॉटेलमध्ये विष पिऊन त्यांनी आत्महत्या केली. आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात कल्याणी फोर्जच्या संचालक अमित कल्याणी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे

निलेश गायकवाड (वय ३२ रा. कोंढवा, पुणे), असे आत्महत्या केलेल्या लेखापालाचे नाव आहे. चाकणच्या गंधर्व हॉटेलमध्ये दोन दिवसांपूर्वी विष पिऊन आत्महत्या केली १० पानांची सुसाईड नोट लिहली आहे. त्यामध्ये अमित कल्याणी यांना सर्वस्वी जबाबदार धरले आहे.

चाकण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गायकवाड हे मुंढवा येथील कल्याणी फोर्ज येथे वरिष्ठ लेखापाल म्हणून कार्यरत होते. गायकवाड याने कल्याणी यांच्यासाठी एकाकडून १५ कोटी घेतले होते. मात्र कल्याणी यांनी  केवळ ११ कोटी ४० लाख रुपये परत दिले होते. तर गायकवाड याचे ६० लाखांचे कमीशनही कल्याणी यांनी गायकवाड यांना दिले नव्हते. त्यामुळे ज्यांचे १५ कोटी गायकवाड यांनी घेतले होते. त्यांनी गायकवाड यांच्यामागे पैशासाठी ससेमिरा लावला होता. मात्र, कल्याणी याने प्रतिसाद देणे बंद केले. गायकवाड याने किमान आत्ता उर्वरित साडेतीन कोटी पैकी दीड कोटी तरी द्या अशी मागणी केली. मात्र, त्यालाही कल्याणी यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे गायकवाड याने निराशेतून दबावातून विष पिऊन आत्महत्या केल्याचे सुसाईड नोटमध्ये लिहले आहे.

तर गायकवाड हे १७ तारखेपासूनच चाकण येथील गंधर्व हॉटेल येथे राहण्यास आले होते. मात्र, त्याने घरी कोणतीच कल्पना दिली नव्हती. त्यामुळे घरच्यांनीही गायकवाड बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांमध्ये केली होती. त्याने १७ तारखेला रुम बूक केली. मात्र गेली दोन दिवस रुमचा दरवाचा उघडला गेला नाही म्हणून हॉटेल प्रशासनाने पोलिसांना कळवले असता सर्व प्रकार उघडकीस आला. मृतदेह पाहता आत्महत्या दोन दिवसापूर्वीच झाली असावी, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून चाकण पोलीस अधिक तपास करत आहेत.