ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

भाचीच्या पाच महिन्याच्या मुलीला पळवणाऱ्या मावशीला अटक

विश्रांतवाडी, दि. २२ - कौटुंबिक वादातून आपल्याच भाचीच्या पाच महिन्याच्या मुलीचे अपहरण करून पलायन करणाऱ्या महिलेला विश्रांतवाडी पोलिसांनी अवघ्या काही तासातच सोलापूर रेल्वे स्थानकावरून जेरबंद केले. शुक्रवारी (१८ आॅगस्ट)  हा प्रकार घडला.
रत्ना मरोळ (वय ३५, रा. मूळ आंध्रप्रदेश) असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी अमृता आखाडे (वय २० रा. धानोरी) यांनी तक्रार दाखल केली आहे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रत्ना ही फिर्यादी अमृता यांची मावशी आहे. रत्नाचा अमृताच्या पतीसोबत वाद होता त्या वादातून रत्ना हिने पहाटे साडेपाचच्या सुमारास सर्वजण झोपेत असताना अमृताच्या पाच महिन्याच्या मुलीचे अपहरण करून घरातून पलायन केले. सकाळी अमृताच्या कुटुंबियांनी मोबाइलवर तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे घाबरलेल्या अमृता आणि तिच्या  कुटुंबियांनी विश्रांतवाडी पोलिसांत धाव घेत रत्नाविरोधात तक्रार दाखल केली.

विश्रांतवाडी पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक संगीता पाटील यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक अभिजीत चौगुले,कर्मचारी दिनकर लोखंडे, सुनील  खंडागळे, विनायक रामाणे, प्रवीण  भालचिम, सुभाष आव्हाड, योगेश चांगण, ज्योती खरात, रूचिका जमदाडे यांच्या पथकाने रत्नाचा शोध सुरू केला. तिच्या  मोबाईल लोकेशननुसार तपास केला असता ती लोणावळा येथे असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर रात्री साडेआठ वाजता तिच्या मोबाईलचे लोकेशन खडकी  असल्याची माहिती पोलिसांना समजली. रत्ना ही आंध्रप्रदेशमधील आपल्या मूळ गावी जात असावी असा संशय व्यक्त करीत पुणे तसेच सोलापूर रेल्वे पोलिसांना आरोपी महिला आणि तिच्या जवळ असलेल्या लहान मुलीचे फोटो व्हॉटसअप वरून पाठवीत रेल्वेमध्ये तिचा शोध घेण्यास सुरूवात केली. दरम्यान, चेन्नई एक्सप्रेसमधून रात्री बारा वाजता सोलापूर रेल्वे स्थानकावरून रत्ना आणि मुलीस सुखरूप ताब्यात घेतले.