ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

शुल्लक कारणावरून पीएमपीएमएल बस चालकाला मारहाण

आळंदी, दि. २८ - शुल्लक कारणावरून एका कार चालकाने पीएमपीएमएल बस चालकाला शिवीगाळ मारहाण केली आहे. ही घटना काल (रविवारी) दुपारी पाचच्या सुमारास पुणे आळंदी मार्गावर घडली. रामचंद्र दशरत दौड (वय. ४८ रा. अजिंठानगर, चिंचवड), या पीएमपीएमएल बस चालकाला मारहाण करण्यात आला.

बस चालकाने दिलेल्या माहितीनुसार पुणे आळंदी रोडवर साई मंदीर बस स्थानकावर बस दोन मिनिट उभी केनी होती. एमएच १२ एनएच ४३९५ या स्वीफ्ट डीजायरच्या गाडी चालकाने त्याच्या गाडीला कोणताही धक्का लावता त्याने बसच्या पुढे कार आणुन बसमध्ये चढून अशी बस चालवतात का म्हणून रामचंद्र याना शिवीगाळ मारहाण केली

यामध्ये कार चालकाची अद्याप ओळख पटलेली नसून दिघी पोलीस ठाण्यात त्याच्या विरुद्ध सरकारी कामात अडथळा आणणे कर्मचा-यास मारहाण करण्याचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी दिघी पोलीस अधिक तपास करत आहेत.