ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

उपसरपंचांच्या कार्यालयावर झालेल्या हल्ल्यात वापरलेली शस्त्रे हस्तगत

चाकण, दि. ३१ - खेड तालुक्यातील वासुली गावच्या उपसरपंचांच्या पुण्याई कॉम्प्लेक्समधील सायली ग्रुप या कार्यालयावर मागील आठवड्यात नऊ दिवसांपूर्वी हल्ला केल्याप्रकरणी पोलीस कोठडीत असलेल्या सात जणांकडून बुधवारी (दि.३०) रात्री गुन्ह्यात वापरलेला लोखंडी कोयता, स्टम्प, मोटार, घातकशस्त्र जप्त करण्यात आली आहेत.

भाजपचे पदाधिकारी वासुली गावचे उपसरपंच सुरेश पिंगळे (वय ३५) यांच्या व्यावसायिक कार्यालयावर नऊ दिवसांपूर्वी मंगळवारी (दि. २२) हल्ला झाला होता. या प्रकरणी मुख्य सूत्रधार सनी शिंदे याच्यासह भंगारमाल व्यावसायिक गुरूदास तेलंग, कामगार पुरवठा ठेकेदार राकेश येवले, प्रथमेश दौंडकर, हिरामण शेवकर, अल्पवयीन सराईत गुन्हेगार या पाच जणांसह रोहित चव्हाण, अभिषेक टाकळकर आदींवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यातील सर्वांना वेगवेगळ्या ठिकाणांहून अटक करण्यात आली होती

अटक करण्यात आलेल्या सर्वांना खेडच्या न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना ३१ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेला लोखंडी कोयता, स्टम्प, गाड्या कपड्यांसह घातकशस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. भाजपचे पदाधिकारी उपसरपंच पिंगळे हे कामगार पुरवठा ठेकेदार आहेत. त्यांचा काही जणांशी ठेकेदारीचा वाद होता. त्यामुळे दोन्ही गटांकडून एकमेकांना टार्गेट करण्याचे प्रयत्न मागील काही दिवसांपासून सुरू असल्याचे समजते. चाकण पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत

सुरेश पिंगळे हे भाजपचे पदाधिकारी असल्याने त्यांनी कार्यालयावरील हल्ल्याचा प्रकार उच्चस्तरीय नेत्यांपर्यंत पोहोचविला होता. त्यानंतर अत्यंत वरिष्ठ स्तरावरून सूत्रे हलली पोलीस प्रशासनावर मोठा दबाव आल्याची माहिती प्राप्त होत आहे. पिंगळे यांच्या विरोधातील हल्ल्यात प्रत्यक्ष सहभागी असलेल्या सर्वांना तातडीने ताब्यात घेऊन कारवाई करावी म्हणून भाजपच्या एका बड्या नेत्यासह मुंबईहून सूत्रे फिरत असल्याने वरिष्ठ अधिकारी यावर लक्ष ठेवून असल्याची चर्चा आहे.