ब्रेकिंग न्यूज
उल्हासनगर : रेल्वे स्टेशनबाहेर वडापावच्या दुकान मालकाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, चंदरलाल रामरखियानी 100 % भाजले      पाकिस्तानात बेपत्ता झालेले दोन्ही मौलवी भारतात परतले      बेळगावात ड्राय डेच्या दिवशी दारु न दिल्याने पोलिसांची हॉटेल मॅनेजरला लाथा-बुक्क्यांनी मारहाण      नागपूरमध्ये राजू शेट्टी यांचे स्टेट बँक इंडियाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन      पतीची हत्या करुन मृतदेह बीएमडब्ल्यू गाडीत लपवला, पत्नीविरोधात गुन्हा दाखल, पंजाबमधील घटना      उत्तरप्रदेशमध्ये बहुजन समाज पक्षाचे नेते मोहम्मद समी यांची भररस्त्यात हत्या      छत्तीसगडमधील दंतेवाडामधूल पाच नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा हस्तगत      महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना फसवणारा, जनतेला गाजर दाखवणारा अर्थसंकल्पः जयंत पाटील      जळगाव : शहरापासून जवळच असलेल्या भादली गावात मध्यरात्री एका कुटुंबातील चौघांची चोरटयांनी हत्या केली.      मुंबईने गमावला मतदानाचा अधिकार, ईशान्य भारतातील राज्यांना मिळाला BCCI मध्ये मतदानाचा हक्क
...

महाराष्ट्र साहित्य परिषद भोसरी शाखेचा मंगळवारी पुरस्कार सोहळा

भोसरी, दि. ४ - महाराष्ट्र कामगार साहित्य परिषद महाराष्ट्र साहित्य परिषद भोसरी शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने समाजाच्या विविध क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींना देण्यात येणारे पुरस्कार जाहीर झाले आहेत. पुरस्कार वितरण सोहळा मंगळवार (दि. १२) रोजी भोसरी येथील कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृहात सकाळी दहा वाजता होणार आहे.

ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक राजदत्त यांना गदिमा जीवनगौरव पुरस्कार देण्यात येणार आहे. पुरस्कार वितरण सोहळ्याचे अध्यक्ष कवी डॉ. विठ्ठल वाघ तर स्वागताध्यक्ष सुदाम भोरे असणार आहेत. कार्यक्रमासाठी डॉ. रामचंद्र देखणे प्रा. मिलिंद जोशी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. . दि. माडगूळकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ  कविता महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. कविता महोत्सवाचे यंदा २४ वे वर्ष आहे.

महाराष्ट्र कामगार साहित्य परिषद महाराष्ट्र साहित्य परिषद भोसरी शाखेतर्फे अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराजराजे भोसले यांना गदिमा चित्रमहर्षी पुरस्कार, संगीत कला अकादमी राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त रेश्मा मुसळे-परितेकर यांना गदिमा लोककला पुरस्कार, डॉ. नयनचंद्र सरस्वते यांना त्यांच्या 'भारतरत्न' या पुस्तकासाठी मृत्युंजय साहित्य पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
भोसरी येथील संत साई इंग्लिश मिडीयम स्कूल आणि श्री टागोर माध्यमिक विद्यालय या शाळांना गदिमा संस्कारक्षम शाळेचा सन्मान देण्यात येणार आहे. या सोहळ्यात उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणा-या व्यावसायिकांना देखील पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. यंदाचे महाराष्ट्र उद्योग भूषण पुरस्कार भोसरी येथील प्रगती इंजिनिअरिंगचे लक्ष्मण काळे आणि पिंपरी येथील ग्रॅप फायर इंडस्ट्रीजचे गजानन चरपे यांना प्रदान करण्यात येणार आहे.