ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

दुचाकी चोरणा-या टोळीला भोसरी पोलिसांकडून अटक

भोसरी, दि. ५ - पोलिसांनी दुचाकी चोरणा-या जणांच्या टोळीला जेरबंद केले आहे. यामध्ये  त्यांच्याकडून १५ गुन्हे उघडकीस आणले असून साडेपाच लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

सचिन सदाशिव चव्हाण (वय २५) रोहिदास उर्फ अशोक रावसाहेब चव्हाण (वय ३०) , दोघे राहणार. शेडगेवाडी, मुळशी, रमेश सुनील कदम (वय २०, रा. दापोडी), आकाश प्रकाश टिपनवार (रा. फुगेवाडी), अर्जुन किसान असवले (रा. नवी सांगवी), शाहनवाज किसन सय्यद (रा.कासारवाडी), अजमात शमशेर खान (रा. औरंगाबाद), अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

दोन सराईत दुचाकी चोरटे आळंदीतील शास्त्री चौक परिसरात दुचाकी विकण्यासाठी येणार असल्याची माहिती भोसरी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याजवळ असणारी दुचाकी चोरीची असल्याचे निदर्शनास आले असता त्यांना अटक करून अधिक चौकशी करण्यात आली. त्यांच्याकडून चोरीचे आणखी दहा गुन्हे उघडकीस आले. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार इतर चोरट्यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पाच गुन्हे उघडकीस आले.  सर्व आरोपींकडून एकूण १५ गुन्हे उघडकीस आले असून लाख ५५ हजार रुपयांच्या  दुचाकी हस्तगत करण्यात आल्या.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप कुलकर्णी, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अजय भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रमोद कटोरे, काळुराम लांडगे, कर्मचारी महादेव धनगर, संदीप गवारी, विनायक म्हसकर, गणेश हिंगे, संतोष महाडिक, बाळासाहेब विधाते, समीर रासकर, नितीन खेसे, सागर भोसले या पथकाने ही कारवाई केली