ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

पुण्यात बस ईथेनॉलवर चालविण्यासाठी प्रयत्न करणार - नितीन गडकरी

भोसरी, दि. ८ - शहरातील  प्रदुषण कमी करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. पिंपरी-चिंचवड, पुणे शहराच्या आजुबाजूला साखर कारखाने आहेत. त्यामुळे ईथेनॉल उपलब्ध होऊ शकते. त्याचा वापर करुन पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये  ईथेनॉलवर बस ईथेनॉलवर चालविण्यासाठी प्रयत्न करणार आहे, असे केंद्रीय रस्ते वाहतूक जलसंधारण मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले

नाशिक फाटा भोसरी येथील नॅशनल इन्स्टिटयूट ऑफ रोड ट्रान्स्पोर्ट (सीआयआरटी) विभागाच्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमांचे उद्घाटन आज (शुक्रवारी) त्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी महापौर नितीन काळजे,  सीआयआरटीचे कॅप्टन राजेंद्र साने-पाटील, पुण्याचे खासदार अनिल शिरोळे, अमर साबळे, आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, आयुक्त श्रावण हर्डीकर आदी उपस्थित होते

पेट्रोल, डिझेलपेक्षा पर्यायी इंधनाचा वापर करणे गरजेचे आहे. ईथेनॉलचा वापर केल्यास वाहतूक व्यवस्था नफ्यात येईल, असे सांगत गडकरी म्हणाले, आगामी काळात मिथेनॉल, इथेनॉल, बायोगॅस, वीज यांचा पर्यायी इंधन म्हणून प्रभावीपणे वापर करता येईल. तसे झाल्यास शेतक-यांना मोठय़ा प्रमाणात दिलासा मिळेल. देशात दोन हजार ड्रायव्हिंग ट्रेनिंग सेंटर तयार करण्यात येणार आहेत. देशात २२ लाख वाहनचालकांची कमी आहे. देशातील वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी सीआयआरटीने आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारावर प्रोजेक्ट तयार करावेत. त्यासाठी लागेल तेवढा पैसा द्यायला केंद्र सरकार तयार आहे

देशातील प्रत्येक जिल्ह्यात खासदारांच्या अध्यक्षतेखाली रोड समितीची स्थापना करण्यात येणार आहे. या समितीमध्ये जिल्हाधिका-यांचा सहभाग असणार आहे. या समितीने हद्दीतील महामार्गाची पाहणी करायची आहे. सार्वजनिक वाहतूक सुरक्षित करण्यासाठी पर्याय सांगणे गरजेचे आहे, असेही गडकरी म्हणाले

देशातील बस स्थानके अत्यंत  खराब आहेत.  बस स्थानके सुसज्ज असली पाहिजेत.  बस स्थानके विमानतळासारखी करण्यासाठी निधी उपलब्ध करुन दिला आहे. सर्व सोयी-सुविधा असलेली बस Posted On: 08 September 2017