ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

पिंपरी पालिकेला लाचखोरीचे ग्रहण, ६ कर्मचारी पकडले

पिंपरी, दि. १ - पिंपरी-चिंचवड महापालिकेला लाचखोरीचे ग्रहण लागल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. कारण अवघ्या पाच महिन्यात पालिकेच्या सहा अधिकारी कर्मचा-यांना लाच घेताना एसीबीने रंगेहाथ पकडले आहे. त्यामध्ये तत्कालीन आयुक्तांच्या स्वीय सहाय्यकाचाही समावेश आहे.

सरकारी व्यवस्थेतील भ्रष्टाचार मोडीत काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जात आहेत. जनजागरण मेळावे आणि शिबिराच्या माध्यमातून याचे महत्व पटवून दिले जात आहे. त्यानंतरही व्यवस्थेतील भ्रष्टाचार समोर येतच आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिकेतील १७ फेब्रुवारी १९९७ ते ३१ जुलै २०१७ या कालावधीत तब्बल २२ अधिकारी, कर्मचा-यांना लाच स्वीकारताना एसीबीने रंगेहाथ पकडले आहे.

त्यापैकी १५ अधिकारी, कर्मचारी निर्दोष मुक्त होऊन सेवेत रुजू झाले आहेत. तर, एका अधिका-याला सेवेतून कार्यमुक्त करण्यात आले आहे. २२ मार्च ते ३१ जुलै २०१७ या अवघ्या पाच महिन्यात पालिकेतील सहा अधिकारी कर्मचा-यांना लाच स्वीकाराताना लाच लुचपत प्रतिबंधक (एसीबीने) रंगेहाथ पकडले आहेत. यामुळे मात्र पालिकेची प्रतिमा डागाळली जात आहे.

क्रीडा प्रबोधनासाठी जेवण नाष्टाचे बील पास करून देण्यासाठी तसेच, त्याचा अहवालासाठी पुरवठादाराकडून २० हजारांची मागणी पालिकेच्या शिक्षण अधिकारी अलका ज्ञानेश्वर कांबळे क्रीडा प्रबोधिनी शाळेचे मुख्याध्यापक बाबासाहेब अंबादास राठोड यांनी केली होती. त्यातील पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना २१ मार्च २०१७ रोजी एसीबीने रंगेहाथ पकडले होते.

एका बिल्डरला बांधकामाचा पूर्णत्वाचा दाखला देण्याकरीता त्याच्याकडून १२ लाखाची लाच स्वीकारताना पिंपरी-चिंचवड महापालिकेचे तत्कालीन आयुक्त दिनेश वाघमारे यांचे स्वीय सहाय्यक लघुलेखक राजेंद्र सोपान शिर्के यांना २४ एप्रिल २०१७ रोजी एसीबीने पालिकेच्या प्रवेशद्वारासमोरच रंगेहाथ पकडले होते. थेट आयुक्तांच्या स्वीय सहाय्यकालाच लाच स्वीकाराताना तेही पालिकेच्या प्रवेशद्वारासमोर पकडल्याने एकच खळबळ उडाली होती. त्यातच आयुक्तांची दोन दिवसांपूर्वी बदली होती. त्यामुळे यावरून विरोधकांनी तत्कालीन आयुक्तांवर गंभीर आरोप केले होते.

विनापरवाना लावलेले जाहिरात फलक कमी