ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

मेट्रो प्रकल्पासाठी ४८६ झाडांचा बळी, पर्यावरण प्रेमी नाराज

पिंपरी, दि. २ - मेट्रो प्रकल्पासाठी पिंपरी-चिंचवड शहरातील ४८६ झाडे तोडावी लागणार आहेत. प्रकल्पासाठी काढण्यात येणा-या या झाडांमुळे शहराचे पर्यावरण धोक्यात येणार आहे. पर्यावरण प्रेमींनी तीव्र शद्बांत नाराजी व्यक्त केली आहे. तर, पिंपरी- चिंचवड परिसरामध्ये तोडावयाच्या वृक्षांच्या १० पट अधिक वृक्ष लावून पाच वर्षे संवर्धन करणार आहे, असे महामेट्रोने स्पष्ट केले आहे.

महाराष्ट्र मेट्रो रेल कार्पोरेशनतर्फे स्वारगेट ते पिंपरी या पहिल्या मार्गाचे काम सुरू झाले आहे. त्यामध्ये पिंपरी-चिंचवड हद्दीतील हॅरिस पूल ते पिंपरी महापालिका अशा सात किलोमीटरचा पहिल्या टप्प्यात काम सुरू आहे. त्यामध्ये सहा मेट्रो स्थानके येणार आहेत.

महापालिकेच्या उद्यान विभागाने या महामार्गाच्या दुभाजकावर अनेक वर्षांपासून जोपासलेली झाडे मेट्रो प्रकल्पाच्या मार्गाला अडथळा ठरत आहेत. त्यामध्ये पिंपळ, उंबर, चंदन, कडुनिंब, खाया मोहगणी या देशी वृक्षांचाही समावेश आहे. मेट्रो प्रकल्पाच्या मार्गाला अडथळा ठरत असल्यामुळे ही झाडे तोडावी लागणार आहेत. यामुळे पर्यावरण प्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे. पालिकेच्या उद्यान विभागाने या झाडांना तीनदा जीवनदान दिले आहे. महामार्गाच्या रस्ता रुंदीकरणावेळी उद्यान विभागाने ही झाडे वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. त्यानंतर बीआरटी प्रकल्पावेळी अशा पद्धतीने तीन वेळा ही झाडे वाचविण्यात उद्यान विभागाला यश आले.

महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी झाडे तोडण्यास परवानगी दिली आहे. हॅरिस ब्रीज ते पिंपरीच्या ग्रेडसेपरेटरपर्यंत झाडांचा विस्तार कमी करणे, झाडांचे पुर्नरोपण करणे, झाडे पूर्ण काढून टाकणे अशी एकूण ४८३ तसेच दुभाजकांवरील सुशोभीकरणासाठी लावलेल्या फुलांची झाडे वेल असा सुमारे चार हजार ५६७ चौरस मीटरचा भाग पूर्ण काढण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. ही परवानगी देताना सुशोभीकरणाचे पुर्नस्थापन करणे, वृक्ष काढताना वाहतूक, विद्युत तारा इतर मालमत्तांचे नुकसान होणार नाही याची जबाबदारी घेण्याची अट आहे. काढलेल्या वृक्षाऐवजी प्रत्येकी १० वृक्ष लावण्यात यावेत, अन्यथा कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.