ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

पालिकेच्या दोन नवीन प्रभागासाठी नवीन फर्निचर, २० लाख रुपये खर्च

पिंपरी, दि. ३ - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नवीन दोन प्रभागांसाठी फर्निचर खरेदी केले जाणार आहे. त्यासाठी येणा-या २० लाख ११ हजार ५२० रुपयांच्या खर्चाला स्थायी समितीने मंजुरी दिली.

पिंपरी पालिकेचे सद्या 'अ', 'ब', 'क','ड', 'इ' आणि 'फ' असे सहा प्रभाग आहेत. त्यामध्ये सांगवी आणि थेरगाव येथे होणा-या 'ग' आणि 'ह' अशा आणखी दोन प्रभागांचा समावेश होणार आहे. नवीन प्रभागरचेनुसार या दोन्ही क्षेत्रीय कार्यालयांसाठी आवश्यक फर्निचर पालिकेच्या मध्यवर्ती भांडार विभागामार्फत खरेदी केले जाणार आहे. त्यासाठी पालिकेतर्फे प्रसिद्धी देऊन ऑनलाई निविदा मागविली होती. एकूण एक ते सहा बाबींसाठी प्राप्त निविदांमधून सर्वात कमी दराच्या तीन निविदा स्वीकारण्यात आल्या.

त्यामध्ये तीन व चार क्रमांकांच्या बाबींसाठी निर्मिती इंजिनीअरिंग कॉर्पोरेशन या ठेकेदार कंपनीची ११ लाख २२ हजार ४८० रुपये किमतीची निविदा आहे. पाच आणि सहा क्रमांकांच्या बाबींसाठी शिवसमर्थ एंटरप्रायजेसची चार लाख ७३ हजार ४० रुपये किमतीची आणि एक व दोन क्रमांकांच्या बाबीसाठी स्वराज्य फर्निचर अॅण्ड इलेक्ट्रॉनिक मॉलची चार लाख १६ हजार रुपयांची निविदा आहे. तीनही निविदांचे दर अंदाजपत्रकीय दरापेक्षा ४४.८८ टक्क्यांनी कमी आहेत. फर्निचर खरेदीसाठी २० लाख ११ हजार ५२० रुपये खर्च येणार असून नवीन 'ग' आणि 'ह' क्षेत्रिय कार्यालयांसाठी फर्निचर तिन्ही ठेकेदार कंपन्यांकडून खरेदी केले जाणार आहे.