ब्रेकिंग न्यूज
उल्हासनगर : रेल्वे स्टेशनबाहेर वडापावच्या दुकान मालकाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, चंदरलाल रामरखियानी 100 % भाजले      पाकिस्तानात बेपत्ता झालेले दोन्ही मौलवी भारतात परतले      बेळगावात ड्राय डेच्या दिवशी दारु न दिल्याने पोलिसांची हॉटेल मॅनेजरला लाथा-बुक्क्यांनी मारहाण      नागपूरमध्ये राजू शेट्टी यांचे स्टेट बँक इंडियाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन      पतीची हत्या करुन मृतदेह बीएमडब्ल्यू गाडीत लपवला, पत्नीविरोधात गुन्हा दाखल, पंजाबमधील घटना      उत्तरप्रदेशमध्ये बहुजन समाज पक्षाचे नेते मोहम्मद समी यांची भररस्त्यात हत्या      छत्तीसगडमधील दंतेवाडामधूल पाच नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा हस्तगत      महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना फसवणारा, जनतेला गाजर दाखवणारा अर्थसंकल्पः जयंत पाटील      जळगाव : शहरापासून जवळच असलेल्या भादली गावात मध्यरात्री एका कुटुंबातील चौघांची चोरटयांनी हत्या केली.      मुंबईने गमावला मतदानाचा अधिकार, ईशान्य भारतातील राज्यांना मिळाला BCCI मध्ये मतदानाचा हक्क
...

पाच महिन्यानंतर अखेर योगेश बहल विरोधी पक्षनेत्याच्या खुर्चीवर विराजमान

पिंपरी, दि. ५ - पिंपरी-चिंचवड महापालिकेतील विरोधी पक्ष नेत्याचे पूर्वीचे कार्यालय अपुरे असल्यामुळे राष्ट्रवादीने ते कार्यालय स्वीकारण्यास नकार दिला होता. त्यामुळे सत्ताधा-यांनी राष्ट्रवादीला दुस-या मजल्यावर कार्यालय दिले. मात्र ते राष्ट्रवादीने स्वीकारले नाही. सत्ताधाऱ्यांकडून काँग्रेसच्या वाट्याला असलेल्या कार्यालयावर राष्ट्रवादीची बोळवण करण्यात आली. त्यामुळे योगेश बहल मागील पाच महिन्यांपासून आपल्या विरोधी पक्षनेते पदाच्या खुर्चीवर बसता कार्यालयीन कामकाज करीत होते. त्यानंतर नवीन कार्यालय मिळण्याची आशा मावळल्याने नाईलाजास्तव पाच महिन्यानंतर काल, शुक्रवारपासून योगेश बहल यांनी विरोधी पक्षनेत्याच्या खुर्चीवर बसून कामकाज करण्यास सुरुवात केली.

फेब्रुवारी २०१७ मध्ये झालेल्या पालिका निवडणुकीत राष्ट्रवादीचा पराभव झाला आणि भाजपच्या हातात सूत्रे आली. पिंपरी पालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे ३६नगरसेवक निवडून आले. दुस-या क्रमांकाचे संख्याबळ असल्याने राष्ट्रवादीला विरोधी पक्षनेतेपदाचे कार्यालय देण्यात आले. मात्र, हे कार्यालय खूपच छोटे असल्याने ते स्वीकारण्यास राष्ट्रवादीने नकार दिला.

राष्ट्रवादीचे दोन स्वीकृत नगरसेवक निवडून आले. त्यामुळे त्यांची संख्या ३८ झाली. पिंपरी महापालिकेत प्रथमच ३८ नगरसेवक असलेला पक्ष विरोधी पक्षात आहे. पूर्वी विरोधी पक्षनेत्याचे कार्यालय महापालिका मुख्यालयाच्या तिसऱ्या मजल्यावर होते. सध्या असलेले विरोधी पक्षाचे कार्यालय राष्ट्रवादीला अपुरे पडत आहे. त्यामुळे दुसरे दालन देण्यासाठी राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी कार्यालया बाहेर बसूनच कामकाज करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांच्यासाठी तुलनेने मोठ्या कार्यालयासाठी शोध सुरू झाला.

सध्याचे उपमहापौर पक्षनेते यांचे कार्यालय तसेच नगरसचिवांचे कार्यालय अशा अनेक जागांचे पर्याय निवडण्यात आले, त्यावर चर्चाही झाली. मात्र, भाजपने उपमहापौर पक्षनेत्यांचे कार्यालय देण्यास स्पष्ट नकार दिला. इतर कार्यालयांच्या बाबतीतही अंतिम निर्णय झाला नाही. मात्र, मोठे कार्यालय मिळावे, यासाठी राष्ट्रवादीचे नेते ठाम होते.

दुस-या मजल्यावर कार्यालय राष्ट्रवादीसाठी उपलब्ध करुन देण्यात आले होते. मात्र, राष्ट्रवादीने ते स्वीकारण्यास नकार दिला. त्यानंतर जैवविविधता समितीच्या अध्यक्षांसाठी ते दालन देण्यात आले. त्यामुळे राष्ट्रवादीला पूर्वीच्याच कार्याल