ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

वाड-वडील हिंदू -मराठा असताना काळजे ओबीसी कसे – मृणाल पाटील

पिंपरी, दि. ५ - पिंपरी-चिंचवड शहराचे महापौर नितीन काळजे यांचे वडील, आजोबा, पणजोबा, चुलते, चुलत भाऊ या सर्वांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर जात नोंद 'हिंदू -मराठा' असताना ते ओबीसी कसे? असा प्रश्न विचारत तक्रारदार मृणाल ढोले पाटील आणि नितीन काळजे यांच्या विरोधात निवडणुकीतील पराभूत उमेदवार घनःश्याम खेडकर यांनी काळजेंचा जातीचा दावा खोटा आहे, असे सांगत त्यांनी त्वरीत राजीनामा देण्याची मागणी पत्रकार परिषदेत केली.

यावेळी घनःश्याम खेडकर यांनी पुरावा म्हणून महापौर नितीन काळजे यांच्यासह, त्यांच्या वडिलांचा आणि आजोबांचा शाळा सोडल्याचा दाखला दाखविला. या सर्वांच्या दाखल्यावर हिंदू-मराठा अशी नोंद आहे. हे सर्व पुरावे जात पडताळणी समितीमोर सादर केल्याचे त्यांनी सांगितले. महापौर नितीन काळजे सत्ताधारी पक्षाचे असल्याने त्यांना वाचविण्यासाठी समितीच्या कामकाजामध्ये राजकीय हस्तक्षेप केला जाण्याची शक्यता खेडकर यांनी यावेळी व्यक्त केली. या लढाईत निकाल जर विरोधात गेला तर क्षणाचाही विलंब करता उच्च न्यायालयात धाव घेणार आहे, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

घनःश्याम खेडकर पुढे म्हणाले की, आम्हीही त्याच गावात राहतो त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला पूर्वापार पिढीजात ओळखतो, त्यांचे रोटीबेटी व्यवहार बघतो, लग्न समारंभात भाग घेतो, गावात काळजे कुटुंबीय हे ९६ कुळी मराठा म्हणूनच ओळखले जातात, मग हा समज चुकीचा आहे का? मग गावात वावरताना उच्च वर्णीय म्हणून वावरायचे आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी फक्त मागासलेले आहे, असे दाखवायचे हे वागणे चुकीचे इतर समाजावर अन्याय करणारे आहे. तीन ऑगस्ट रोजी या प्रकरणाची अंतिम सुनावणी पूर्ण झाली असून काही दिवसात याप्रकरणी निकाल लागणे अपेक्षित आहे. तत्पूर्वी जात पडताळणी समितीवर राजकीय दबाव येण्याची शक्यता आहे. त्यामुळेच सत्य बाहेर येण्यासाठी जातपडताळणी समितीसमोर सादर केलेले काही पुरावे आम्ही माध्यमांसमोर मांडत आहोत, अशी माहिती मृणाल ढोले यांनी दिली

माझ्याकडे १७ पुरावे, त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही - महापौर काळजे

माझे खापर पणजोबा Posted On: 05 August 2017