ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीचे बिल देण्याची महापालिकेकडे पुरवठादार संस्थेची मागणी

पिंपरी, दि. ७ - पिंपरी-चिंचवड महापालिकेला आषाढीवारी पालखी सोहळ्यात दिंडीकराना देण्यासाठी अक्षय ग्रीन एनर्जी या पुरवठादार संस्थेने सुमारे ६५० विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीचा पुरवठा करण्यात आलेला होता. त्या मूर्तींचे २५ लाख रुपयांचे बिल पालिकेने दिलेले नाही. ते बिल देण्याची मागणी पुरवठादाराने पालिकेकडे केली आहे.

याबाबत पालिका आयुक् श्रावण हर्डीकर यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात म्हटले आहे की, आषाढीवारी पालखी सोहळा २०१६ मध्ये दिंडीकरांना विठ्ठल-रुक्मिणी मूर्ती दिलेली आहे. संत तुकाराम महाराज पालखीला 350 मूर्ती संत ज्ञानेश्वर महाराज पालखीला ३०० मूर्ती अशा एकूण ६५० मूर्ती महापालिकेने अक्षय ग्रीन एनर्जी संस्थेकडून विकत घेतल्या होत्या.

त्या मूर्तीचे सुमारे २५ लाख रुपये महापालिकेने त्या पुरवठादारास दिलेले नाही. ते बिल देण्याची मागणी अक्षय ग्रीन एनर्जीकडून अक्षय आल्हाट यांनी या निवेदनातून केली आहे. बिल वेळेत दिल्यास नाईलाजास्तव कुटुंबीय कर्मचा-यांसह पालिकेसमोर उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.