ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

पिंपरी पालिकेतर्फे विश्वास नांगरे पाटील यांचे व्याख्यानाचे आयोजन

पिंपरी, दि. ९ - महिला आणि महाविद्यालयीन-शालेय विद्यार्थिनींच्या सुरक्षेबाबत उपाययोजननांसदर्भात पिंपरी-चिंचवड पालिकेच्या महिला बालकल्याण समितीच्या बैठकीत चर्चा झाली. तसेच शहरातील मुली, महिला शाळा तसेच महाविद्यालयातील विद्यार्थीनी यांच्यासाठी सुरक्षिततेच्या दृष्टीने करावयाच्या उपायोजनांबाबत कोल्हापुर परिक्षेत्राचे विशेषपोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात येणार आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महिला बालकल्याण समिती सभापती सुनीता तापकीर यांच्या अध्यक्षतेखाली शहरातील मुली, महिला विद्यार्थींनीच्या सुरक्षितेतसाठी करावयाच्या उपायोजनाबाबत मंगळवार (दि.) विशेष बैठक घेण्यात आली. महापालिकेच्या कै. मधुकर पवळे सभागृहात घेण्यात आलेल्या या बैठकीस नगरसेविका योगिता नागरगोजे, निकिता कदम, चंदा लोखंडे, रेखा दर्शिले, नगरसदस्य सागर आंगोळकर, सहाय्यक आयुक्त प्रवीण अष्टीकर, समाज विकास अधिकारी संभाजी ऐवले, सहाय्यक समाज विकास अधिकारी सुहास बहाद्दरपुरे, प्रशासन अधिकारी बजरंग आवारी, आयटीआयचे प्राचार्य शशिकांत पाटील, कार्यालयीन अधीक्षक सोमा आंबवणे आदी उपस्थित होते.

यावेळी बैठकीत शहरातील मुली, महिला विद्यार्थीनींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महापालिकेच्या वतीने तसेच पोलीस यंत्रणेच्या वतीने करावयाच्या विविध उपाय योजनाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. या वेळी झालेल्या चर्चेत महिला बाल कल्याण समिती सभापती सुनीता तापकीर, नगरसदस्या योगिता नागरगोजे, नगरसदस्य सागर आंगोळकर, सहाय्यक आयुक्त प्रवीण अष्टीकर, समाज विकास अधिकारी संभाजी ऐवले, प्रशासन अधिकारी बजरंग आवारी आदींनी सहभाग घेऊन आपले विचार मांडले.

लवकरच महापालिकेच्या महिला बाल कल्याण समितीच्या वतीने विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांचे शहरातील मुली, महिला शाळा तसेच महाविद्यालयातील विद्यार्थीनी यांच्यासाठी सुरक्षिततेच्या दृष्टीने करावयाच्या उपायोजनांबाबत व्याख्यानाचे आयोजन करण्यात येणार असल्याचे महिला बालकल्याण समिती सभापती सुनीता तापकिर यांनी यावेळी सांगितले.