ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

वायसीएमच्या वैद्यकीय अधिका-याची खातेनिहाय चौकशी सुरू

पिंपरी, दि. ९ - अधिकारात नसताना विम्याच्या दाव्यासाठी खोटी बोगस कागदपत्रे तयार करणा-या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयातील वैद्यकीय अधिका-याची खातेनिहाय चौकशी सुरू करण्यात आली आहे. याबाबत पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आदेश दिला आहे.

डॉ. श्रीकांत सिद्राम शिंगे असे खातेनिहाय चौकशी सुरू करण्यात आलेल्या वैद्यकीय अधिका-याचे नाव आहे. शिंगे हे पालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी या '' श्रेणीतील पदावर कार्यरत आहेत. लखन घनःश्याम नवले यांचा १६ नोव्हेंबर २०१४ रोजी मृत्यू झाला. त्यांचे वायसीएम रुग्णालयात शवविच्छेदन झाले. मात्र, मार्च २०१७ रोजी नवले यांचा अहवाल भरून देताना डॉ. शिंगे यांनी त्यांचा मृत्यू १५ मार्च २०१६ रोजी झाल्याचे नमूद केले.

जीवन वीमा प्रतिपूर्ती संदर्भात मृत्यू दावा अर्ज भरण्याची जबाबदारी वैद्यकीय विभागाची असताना आणि वायसीएम रुग्णालयातील नोंदीनुसार, नवले यांच्या दाव्यासंदर्भातील प्रकरण डॉ. शिंगे यांच्याकडे देण्यात आले नसतानाही त्यांनी अनाधिकाराने मृत्यू दावा अर्ज भरला. या प्रकरणात आयसीआयसीआय या विमा संस्थेकडील ३० लाख रुपये रकमेचा तसेच अविवा लाईफ इन्शुरन्स या संस्थेच्या विम्याकरिता दावा दाखल करण्यात आला आहे. डॉ. शिंगे यांनी या जीवन विम्याचा अर्ज भरला असल्याने त्यांनी गंभीर स्वरूपाचे गैरवर्तन केल्याचे निदर्शनास आले.

खोटी बनावट कागदपत्रे तयार करून गैरवर्तन केल्याप्रकरणी डॉ. शिंगे यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. परंतु, या नोटीसीवर त्यांनी केलेला खुलासा असमाधानकारक आहे. डॉ. शिंगे यांनी सरकारी कर्मचा-याला अशोभनीय ठरेल, असे गैरवर्तन करून महाराष्ट्र नागरी सेवा नियमाचा भंग केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी डॉ. शिंगे यांच्या खातेनिहाय चौकशीचे आदेश दिले आहेत. या आदेशाची नोंद त्यांच्या सेवानोंद पुस्तकातही घेण्यात येणार आहे.