ब्रेकिंग न्यूज
उल्हासनगर : रेल्वे स्टेशनबाहेर वडापावच्या दुकान मालकाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, चंदरलाल रामरखियानी 100 % भाजले      पाकिस्तानात बेपत्ता झालेले दोन्ही मौलवी भारतात परतले      बेळगावात ड्राय डेच्या दिवशी दारु न दिल्याने पोलिसांची हॉटेल मॅनेजरला लाथा-बुक्क्यांनी मारहाण      नागपूरमध्ये राजू शेट्टी यांचे स्टेट बँक इंडियाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन      पतीची हत्या करुन मृतदेह बीएमडब्ल्यू गाडीत लपवला, पत्नीविरोधात गुन्हा दाखल, पंजाबमधील घटना      उत्तरप्रदेशमध्ये बहुजन समाज पक्षाचे नेते मोहम्मद समी यांची भररस्त्यात हत्या      छत्तीसगडमधील दंतेवाडामधूल पाच नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा हस्तगत      महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना फसवणारा, जनतेला गाजर दाखवणारा अर्थसंकल्पः जयंत पाटील      जळगाव : शहरापासून जवळच असलेल्या भादली गावात मध्यरात्री एका कुटुंबातील चौघांची चोरटयांनी हत्या केली.      मुंबईने गमावला मतदानाचा अधिकार, ईशान्य भारतातील राज्यांना मिळाला BCCI मध्ये मतदानाचा हक्क
...

नऊ वर्षांपासून पवना धरणाचे मजबुतीकरण रखडले

पिंपरी, दि. १०गेल्या ९ वर्षांपासून पिंपरी-चिंचवड शहराची जीवनदायिनी असणा-या पवना धरणाच्या मजबुतीकरणाचे काम रखडले आहे. मावळ परिसरातील शेतक-यांच्या विरोधामुळे हे काम रखडले आहे. धरण मजबुतीकरणाचे काम झाल्यास .४८ टीएमसी साठा क्षमता वाढणार आहे.

पिंपरी-चिंचवड शहराला पवना धरणातून पाणीपुरवठा केला जातो. धरणाच्या मजबुतीकरणाचे काम २००४ मध्ये सुरू करण्यात आले होते. मात्र, २००८ मध्ये मावळातील शेतक-यांच्या आंदोलनानंतर ते काम थांबविण्यात आले आहे. मजबुतीकरणामध्ये डागडुजी, देखभाल दुरुस्ती, पाण्याची गळती रोखणे याचा समावेश होता.

केंद्र शासनातर्फे सार्वजनिक सुविधा सक्षमीकरण, सुविधांचे सेवा पातळ्यांचे मानांकन निश्चित करण्याचे धोरण आखले गेले. त्यानुसार पुण्यापाठोपाठ जवाहरलाल नेहरू नागरी पुनर्निर्माण योजनेत (जेएनएनयूआरएम) भविष्यकालीन पाण्याचे नियोजन केले. त्यानुसार पवना धरणातून बंदिस्त जलवाहिनीद्वारे पाणी आणण्याची योजना पुढे आली. शहराची २०४१ ची लोकसंख्या गृहीत धरून पाण्याचे नियोजन करून २००८ मध्ये बंदिस्त जलवाहिनीचा प्रकल्प आराखडा तयार झाला. मात्र, त्याला मावळातील शेतक-यांनी प्रखर विरोध केला. त्यानंतर धरणाच्या मजबुतीकरणाचे काम देखील थांबविण्यात आले आहे.

हायड्रो इलेक्ट्रिसिटी जनरेशनसाठी टर्बाईनचा वापर केला जातो. पाण्यावर विद्युतनिर्मिती केली जाते. सब स्टेशनवरून तळेगावसाठी ती दिली जाते. पवना धरणसाठा क्षमता १०.७८ टीएमसी आहे. धरणात .६८ टीएमसी पाणी अडवले जाते. धरणाच्या मजबुतीकरणाचे काम २००४ मध्ये सुरू करण्यात आले, मात्र २००८ मध्ये मावळातील शेतकर्यांच्या आंदोलनानंतर ते काम थांबविण्यात आले आहे. धरण मजबुतीकरणाचे काम झाल्यास .४८ टीएमसी साठा क्षमता वाढेल, अशी माहिती अतिरिक्त कार्यकारी अभियंता जॉन बर्वे यांनी दिली.