ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

प्रदूषित पवना नदीमुळे थेट धरणातून पाणी उचलणे आरोग्यास फायदेशीर

पिंपरी, दि. ११ - वाढत्या लोकसंख्येमुळे पवना नदीचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यासाठी नदीतून शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी पाणी उचलण्यापेक्षा थेट धरणातून पाणी उचलणे आरोग्यास फायदेशीर ठरेल. त्या दृष्टीने भविष्यात पवना बंद जलवाहिनी प्रकल्प राबविणे उपयुक्त ठरणार आहे.

पिंपरी-चिंचवड शहराजवळचा गहुंजे, सोमाटणे फाटा, रावेत, किवळे भाग दिवसेंदिवस वाढत आहे. तेथील गृहप्रकल्पांनी राबविलेले शुद्धीकरण प्रकल्प काही काळाचेच असणार हे गृहीत धरून पवना खोर्यात येणारे सांडपाणी नदीत मिसळून नदी प्रदूषित होणार हे निश्चित आहे. पवना इंद्रायणी नदीतील वाढती जलपर्णी हे संकेत आहे. जलपर्णीमुळे नायट्रोजन फॉस्फेट वाढण्याचा नैसर्गिक मार्ग तयार होतो.

मात्र जलपर्णीची अधिक वाढ झाल्यास ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते. नदीतील मासे जलचर मरतात, नदीचे आरोग्य धोक्यात येते, म्हणूनच नदीतून शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी पाणी उचलण्यापेक्षा थेट धरणातून पाणी उचलणे आरोग्यास फायदेशीर ठरेल. त्या दृष्टीने भविष्यात पवना बंद जलवाहिनी प्रकल्प राबविणे उपयुक्त ठरणार आहे.