ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

यंदाचा पिंपरी-चिंचवड गणेश उत्सव डॉल्बीमुक्त करा- रश्मी शुक्ला

पिंपरी, दि. ११ - यंदा गणेश मंडळांनी गणेश उत्सवात डिजेचा निषेध करत गणेश उत्सव डॉल्बीमुक्त करावा, असे आवाहन पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी आज (गुरुवारी) गणेश मंडळांना केले आहे.

गणेशोत्सव यावर्षी देखील शांततेत आनंदी वातावरणात पार पाडण्यासाठी पालिका पुणे शहर पोलीस आयुक्तालय यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील गणेशोत्सव मंडळांचे अध्यक्ष, पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या उपस्थित आज (गुरुवारी) शांतता बैठकीचे पिंपरीच्या आचार्य अत्रे रंगमंदिरात सायंकाळी पाच वाजता आयोजन करण्यात आले होते

यावेळी पुण्याचे सहाय्यक पोलीस आयुक्त रवींद्र कदम, अतिरिक्त पोलीस आयुक्त उत्तर विभाग शशिकांत शिंदेपिंपरी-चिंचवड महापालिकेचे महापौर नितीन काळजे, उपमहापौर शैलजा मोरे, महापालिका आयुक्त श्रावण हार्डीकर, सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे, पोलीस उपायुक्त गणेश शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त राम मांडुरके, पुणे शहर विशेष शाखा पोलीस उपायुक्त संजयकुमार बावीस्कर आदी उपस्थित आहे.

यावेळी बोलताना रश्मी शुक्ला म्हणाल्या की, गणेश मंडळांनी गणेश उत्सवाला गालबोट लागेल, असे कोणतेही काम करू नये. वर्गणी गोळा करताना दादागिरी किंवा जबरदस्ती करू नये. शहरातील सार्वजनिक मंडळांना एकाच ठिकाणी परवानगी देण्यात येईल. मात्र, प्रत्येकांनी नियमांचे पालन करावे. न्यायालयाच्या आदेशानुसार ध्वनी प्रदूषण टाळावे. मंडळांकडून काही चूका झाल्यास आम्हाला न्यायालयात उत्तर द्यावे लागते. यावेळी प्रत्येक मंडळामध्ये जाऊन पोलीस ध्वनीप्रदूषण चाचणीही करणार आहेत.

तसेच प्रत्येक मंडळाने सीसीटीव्ही लावणे गरजेचे आहे. प्रत्येक मंडळाने मंडपामध्ये महत्वाच्या फोन नंबरचा फलक लावावा. जेणेकरून नागरिकांना मदत होईल. त्याचप्रमाणे प्रत्येक पोलीस ठाण्यामध्ये व्हाट्‌स अॅप ग्रुप तयार करण्यात येणार असून, मंडळांचे अध्यक्ष त्यामध्ये समाविष्ट केले जातील. पोलिसांचे त्याकडे लक्ष आहे, हे विसरू नका. डीजेचा वापर टाळा, उत्सव मंगलमय शांतपणे साजरा करा. पोलिसांना सहकार्य करून उत्सव काळामध्ये पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

आजच्या बैठकीमध्ये गणेश मंडळांनी मंडप