ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

पिंपरी-चिंचवडसाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय - गृहराज्य मंत्री पाटील

पिंपरी, दि. ११ - पिंपरी चिंचवडसाठी लवकरच स्वतंत्र पोलीस  आयुक्तालयाची निर्मिती करण्यात येणार आहे. याबाबतची माहिती आज विधानसभेत  गृहराज्यमंत्री रणजीत पाटील यांनी दिली. आमदार गौतम चाबुकस्वार, महेश लांडगे, लक्ष्मण जगताप, शरद सोनावणे, राहुल कुल यांच्या लक्षवेधी सूचनेवर उत्तर देताना ते बोलत होते.

महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सोमवारपासून (दि.२४ जुलै) सुरु झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर आमदार लांडगे, भाजपचे शहराध्यक्ष आणि आमदार लक्ष्मण जगताप, आमदार गौतम चाबुकस्वार, शरद सोनवणे, राहुल कुल यांनी या मुद्यावर राज्य सरकारला सांकडे घातले आहे

दरम्यान, राज्य सरकारच्या वतीने गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी कायदेशीर बाबींची पूर्तता करण्याचे आदेश अधिका-यांना दिले आहेत. गृहविभागाच्या निर्देशानुसार पुणे पोलीस आयुक्तालयाने कार्यवाही करुन अहवालही सादर केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: या प्रश्नात लक्ष घातले आहे. त्यामुळे आगामी काळात पिंपरी-चिंचवडला स्वतंत्र पोलीस आयुक्तालय स्थापन करण्याबाबत लवकरच घोषणा होईल

नव्या पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत पिंपरी-चिंचवड महापालिकेसह, चाकण, तळेगाव दाभाडे या औद्योगिक पट्ट्याचाही समावेश होण्याची शक्यता आहे. आयुक्तालयाचा प्राथमिक आराखडा तयार करून हद्द निश्चितीबाबतही विचार झाला आहे. पिंपरी-चिंचवडची लोकसंख्या २२ लाखांच्या जवळपास आहे. याशिवाय चाकण, तळेगावचा विचार करता लोकसंख्या वाढीला वाव आहे. सध्या पिंपरी-चिंचवडमध्ये एक उपायुक्त दर्जाचा अधिकारी असून, वाहतूक आणि विशेष शाखेसह अन्य वरिष्ठ अधिकारी पुण्यातील आयुक्तालयातून काम पाहतात. वाढते औद्योगिकीकरण आणि शहरीकरणामुळे गुन्हेगारी, जमिनीचे वाद आणि अन्य कारणांमुळे पिंपरी-चिंचवडमध्ये स्वतंत्र आयुक्तालयाची नितांत गरज आहे