ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

लष्कराच्या शस्त्रसज्जतेची ओळख देणारे प्रदर्शनाला नागरिकांची गर्दी

पिंपरी, दि. १२ - पिंपरी येथील एच.. मैदानावर आज (शुक्रवारी) सकाळी अकरा वाजता आमदार लक्ष्मण जगताप, महापालिकेचे महापौर नितीन काळजे, लष्करी अधिकारी यांच्या हस्ते हवेत फुगे उडवून भारतीय लष्कराच्या यंत्रसामुग्रीच्या प्रदर्शनाचे उद्‌घाटन करण्यात आले. आज प्रदर्शनाचा अखेरचा दिवस आहे. कालपासून या प्रदर्शनाला नागरिकांची गर्दी झाली आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिका बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुप ऑफ खडकी यांच्या संयुक्त विद्यमाने हे प्रदर्शन भरवले गेले आहे. यावेळी उपमहापौर शैलजा मोरे, पिंपरी महापालिकेचे आयुक्त श्रावण हार्डीकर, सत्तारुढ पक्ष नेते एकनाथ पवार, स्थायी समिती अध्यक्ष सीमा सावळे, विरोधीपक्ष नेते योगेश बहल, नगरसेविका सुजाता पालांडे, आशा शेंडगे तसेच लष्करी अधिकारी आदी उपस्थित होते. हे प्रदर्शन दि. ११ १२ ऑगस्ट या दोन दिवसात हे प्रदर्शन सकाळी दहा ते रात्री आठ वाजेपर्यंत खुले राहणार आहे. यामध्ये नागरिकांना भारतीय लष्कराचे इन्फंटरी, आर्म्ड, इंजिनिअर्स, सिग्नल्स, एअर डिफेन्स, मेकॅनाईज्ड आदीमध्ये वापरण्यात येणा-या यंत्रसामुग्री नागरिकांना पाहता येणार आहेत.

आज शालेय विद्यार्थ्यांसाठी प्रदर्शन खुले असल्यामुळे विद्यार्थ्यांनी अगदी रणगाड्यावर चढून रणगाड्यांची माहिती जाणून घेतली, भारतीय लष्कराला एवढे जवळून पाहणे, वर्दीचा सहवास सगळ विद्यार्थ्यांसाठी नवीन होते आर्मीच्या जवानांसाठीही. जवान अगदी खोलात छोट्या मुलांना रणगाड्यांची, तोफांची माहिती देत होते. विद्यार्थीही त्यांना विविध प्रश्न विचारून त्यांच्या शंकाचे निरसन करत होते. यावेळी काही जवानांनी त्यांच्या कुटुंबीयांनाही या प्रदर्शनात आवर्जून बोलावले होते. यामध्ये भारतीय लष्कराचे क्रेन, रणगाडे, शस्त्र, त्यांची इतर अवजारे, रडार, तोफ आदी पाहण्याची संधी मिळणार आहे.

या प्रदर्शनात पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अग्निशामक दलातर्फे ब्रॉन्टो स्काय लीफ्ट ही बचाव कार्य करणारी गाडी प्रदर्शनात ठेवली होती. या गाडीचे वैशिष्ठ्य म्हणजे या गाडीला बचाव कार्य करण्यासाठी ५४ मीटर उंचीची यांत्रिक शिडी बसवलेली असते. या गाडीचे प्रात्यक्षिक सुरू होताच तेथे उपस्थित विद्यार्थी जवानांचेही लक्ष वेधले गेले. यामध्ये गाडीसोबत फोटो काढणे शिडीच्या बास्केटमध्ये चढून प्रात्यक्षिक अनुभवणे अशी धमालही