ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

औद्योगिकनगरीत स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

पिंपरी, दि. १६ - पिंपरी-चिंचवड शहरात मंगळवारी ७१ वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. पिंपरी-चिंचवड पालिकेच्या मुख्यालयात महापौर नितीन काळजे यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी आमदार लक्ष्मण जगताप, माजी आमदार ज्ञानेश्वर लांडगे, उपमहापौर शैलजा मोरे, सत्तारूढ पक्षनेता एकनाथ पवार, स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे, विरोधी पक्षनेते योगेश बहल आदी उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खराळवाडी येथील कार्यालयात स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. शहराध्यक्ष संजोग वाघेरे- पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. त्यानंतर महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करुन त्यांना अभिवादन करण्यात आले.

यावेळी विरोधी पक्षनेते योगेश बहल, नगरसेवक भाऊसाहेब भोईर, पक्ष प्रवक्ते फजल शेख, नगरसेवक राजू मिसाळ, विजय लोखंडे, मंहमद पानसरे, सेवादलाचे अध्यक्ष आनंदा यादव, नगरसेविका डॉ. वैशाली घोडेकर, अपर्णा डोके, सुलक्षणा शिलवंत, सिंधु पांढारकर, कविता खराडे, दिपाली लांडे, अरुणा कुंभार, मिनाक्षी उंबरकर, मुमताज इनामदार, सायुजता दोडके, पांडुरंग दोडके, मीनाताई मोहिते, कांचन कुरकुटे, लता ओव्हाळ उपस्थित होते.

नवी सांगवी येथे शिव प्रतिष्ठानच्या वतीने ज्येष्ठ पत्रकार जनार्धन पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. यावेळी प्रतिष्ठानचे आध्यक्ष विक्रम धुमाळ, मानवी हक्क संरक्षण जागृती संस्थेचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष आण्णा जोगदंड, आकाश पांचाळ, अमित मडई, संजय गंवंडाळकर, निलेश गाडेकर, प्रथमेश खूने, पंकज धाराशिवकर आदी उपस्थित होते.

यावेळी आण्णा जोगदंड यांनी समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य घडविण्याचे, त्यांच्या सर्व नागरीकांस सामाजिक, आर्थिक राजनैतिक न्याय, विचार अभिव्यक्ती ,विश्वास , श्रदा उपासना यांचे स्वतंत्र्य व्यक्तीची प्रतिष्ठा राष्ट्राची एकता आणि एकात्मता बंधुता देणारे भारतीय संविधानाच्या प्रतीचे वाटप केले.

नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाच्या तळेगाव येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात ध्वजवंदन समारोह उत्साहात पार पडला. संस्थेचे कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई , प्राचार्य डॉ. राजेंद्र कानफाडे, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने Posted On: 16 August 2017