ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

आपणच बाळाला नदीत फेकल्याची आईची पोलिसांसमोर कबुली

बोपोडी, दि. १७ महिलेने धक्का देऊन आपल्या बाळाला पळवून नेल्याचे सांगणाऱ्या आईनेच आपल्या बाळाला नदीत फेकुन दिल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. रिक्षातून प्रवास करणाऱ्या एका सहप्रवासी बाळ पळविले असल्याचा कांगावा केला होता. आपणच त्या बाळाला नदीत फेकले असल्याची कबुली त्या बाळाच्या आईने पोलिसांसमोर दिली.

पोलिसांनी सांगवी येथील पुलाजवळ नदीपात्रात बाळाचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. मात्र प्रत्यक्ष बाळाचा मृतदेह सापडत नाही तोपर्यंत नेमके काही सांगता येणार नसल्याचे खडकी पोलिसांचे म्हणणे आहे.

बोपोडी येथे काल, मंगळवारी सकाळी रिक्षातून प्रवास करणाऱ्या एका सहप्रवासी महिलेने चक्क बाळाच्या आईला धक्का देऊन त्यांची दहा दिवसाची मुलगी पळविल्याची घटना घडली होती. रेश्मा शेख (वय २० रा. दापोडी) या खडकी येथील एका खासगी रुग्णालयात आपल्या मुलीला उपचारासाठी घेऊन गेल्या होत्या. परतत असताना त्यांनी शेअर रिक्षा केली होती. त्या रिक्षात आधीपासूनच एक महिला प्रवास करत होती. शेख ही पैसे देण्यासाठी खाली उतरली असता आतील महिलेने तिच्या जवळील बाळ हिसकावून रिक्षातून ती पळून गेली अशी तक्रार रेश्मा शेख हिने खडकी पोलिसात दिली होती.

याप्रकरणी पोलिसांनी रिक्षावाला अज्ञात महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला. मात्र पोलीस तपासात रेश्मा शेख हिने दिलेली माहिती संभ्रमात टाकणारी असल्यामुळे पोलिसांनी रेश्मा हिच्याकडे कसून चौकशी केली असता आपणच आपले बाळ सांगवीच्या पुलावरून मुळा नदीपात्रात फेकल्याची कबुली दिली आहे. त्याप्रमाणे पोलीस बचाव पथक नदीपात्रात मृतदेह शोधत आहेत. जोपर्यंत तान्ह्या मुलीचा मृतदेह सापडत नाही तोपर्यंत नेमके काही सांगता येत नाही असे खडकी पोलिसांचे म्हणणे आहे.
रेश्मा शेख हिला पहिली मुलगी आणि एक मुलगा आहे. तिसऱ्या अपत्याचा मृत्यू झाला आहे. तर आता जे बाळ नदीत फेकले, ते तिचे चौथे अपत्य मुलगी होती. तिच्या या कृत्यामागीलनेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही