ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

जावेला मुलगा झाल्याच्या इर्षेतून चिमुकलीला आईनेच नदीत फेकले

बोपोडी, दि. १८ - बोपोडी येथे भरदिवसा माझे बाळ माझ्यापासून हिसकावून नेले असा बनाव करणा-या महिलेनेच आपले दहा दिवसाचे बाळ केवळ इर्षेपोटी नदी पात्रात फेकल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. तिचा हा बनाव खडकी पोलीसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून उघडकीस आणला. रेश्मा रियासत शेख (वय २० रा. बॉम्बे कॉलनी, दापोडी) असे आरोपी महिलेचे नाव असून पोलीसांनी तिला काल (बुधवार) ताब्यात घेतले आहे.

बोपोडी येथे काल (बुधवारी) सकाळी रिक्षातून प्रवास करणाऱ्या एका सहप्रवासी महिलेने चक्क बाळाच्या आईला धक्का देऊन त्यांची दहा दिवसाची मुलगी पाठविल्याची घटना घडली होती. रेश्मा शेख (वय २० रा. दापोडी) या खडकी येथील एका खासगी रुग्णालयात आपल्या मुलीला उपचारासाठी घेऊन गेल्या होत्या. परतत असताना त्यांनी शेअर रिक्षा केली होती. त्या रिक्षात आधीपासूनच एक महिला प्रवास करत होती. शेख ही पैसे देण्यासाठी खाली उतरली असता आतील महिलेने तिच्या जवळील बाळ हिसकावून रिक्षातून ती पळून गेली अशी तक्रार रेश्मा शेख हिने खडकी पोलिसांत दिली होती.

मात्र रेश्मा शेख हिने दिलेली माहीती संभ्रमात टाकणारी व संशयास्पद होती, कारण तिने सांगितलेल्या मार्गावरुन चुकीच्या दिशेने रिक्षा भरधाव वेगाता एका बाळाचे अपहरण करुन नेणे शक्य नाही. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला. यावेळी पोलिसांनी त्या परिसरातील हॉटेल, दुकान यांचे सुमारे दहा सीसीटीव्ही फुटेज तपासले त्यात काही ठिकाणी तिच्या हातात मुल आहे तर काही ठिकाणी नाही. तर एका फुटेजमध्ये रेश्मा शेख ही चालत आली व तिने एका दुकानांसमोर येताच अचानक आरडा ओरड करत रोडवरी पडली व तीने त्या ठिकाणी उपस्थित स्थानिकांना माझे मुल गेले असा कागांवा करताना दिसून आली. त्यामुळे पोलीसांचा संशय खऱा ठरला. पोलिसांनी तिची कसून चौकशी केली असता तीने तिचा गुन्हा कबूल केला.

गुन्हा कबूल करताना तिने सांगितले की, तिच्या जावेला काही दिवसांपुर्वी मुलगा झाला. त्यात शेख यांना एक मोठी मुलगी आहे, एक मुलगा आहे. त्यानंतर एक मुलगी झाली ती न्युमोनियाने वारली. त्यानंतर ही चिमुकली झाली. मात्र जावेला मुलगा आणि मला तीसरी मुलगी याचा राग तिच्या मनात होता. दरम्यान मुलगी आजारी होती तिच्या डोळे पिवळे झाले होते व ती सतत लघवी करत होती. त्यामुळे रेश्माने तिला औंध येथील शेवाळे हॉस्पिटलमध्ये नेले व तेथेच तिने तिला मारण्याचा निर्णय घेतला. तीने तेथून निघताच बाळाला बोपोडीच्या पुलावरून नदीत फेकले.

या तपासात पोलिसांनी श्वान पथकाची मदत घेतली असता श्वानांनीही बोपोडी पुलापर्यंत मार्ग काढला. त्यामुळे अवघ्या २४ तासात खडकी पोलीसांनी गुन्हयाची उकल केली. ही करावाई वरीष्ठ पोलीस निरीक्षक लक्ष्मण बोराटे, पोलीस निरीक्षक अजित लकडे, पोलीस उपनिरीक्षक मदन कांबळे व पोलीस कर्मच्या-यांनी केली.